जामखेड प्रतिनिधी : ८ सप्टेंबर
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि. ८ रोजी अनंत चतुर्दशीच्या पुर्व संध्येला पोलीस बांधवानी स्थापन केलेल्या
गणेशाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
पोलीस गाडीवर गणरायाची मनमोहक मुर्ती, वाद्याचा कमी परंतु लयबद्ध सुर आणि परिसरात निर्माण झालेले भक्तीमय वातावरणात या पार्श्वभूमीवर पोलीस बांधवाना नाचण्याचा मोह काही आवरता आला नाही. अगदी देहभान विसरून पोलीस नाचण्यात दंग झालेले पाहायला मिळाले. जामखेड पोलिसांनी अगदी नाचत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन केलं. व शिस्तबध्द मिरवणुकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
यावेळी बोलताना पोलीस निरीरक्षक संभाजी गायकवाड म्हणाले की, पोलीस कर्मचारी हे सातत्याने एकामागून एक बंदोबस्त करत असतात. यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे आपल्या वारंवार निदर्शनास येते , असे उत्सव साजरे केल्याने ताण कमी होण्यास उपयोगी ठरते. याच कारणाने पोलीस स्टेशनच्या वतीने यावर्षी गणेश स्थापना व मिरवणूक काढण्यात आली व पोलीस बांधवांनी याचा मनसोक्त आनंद लुटला.
या मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, अनिल भारती, महिला उपनिरीक्षक मनीषा वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी भोस, परमेश्वर गायकवाड, महादेव गाडे, हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, भगवान पालवे , संजय लाटे , पोलीस नाईक अविनाश ढेरे, अजय साठे, संग्राम जाधव, राहुल हिंगसे, बाळासाहेब तागड, पोलीस नाईक भागवत, कॉन्स्टेबल आबा आवारे, संदीप आजबे, विजय कोळी, अरुण पवार , श्रीकांत शिंदे, ईश्वर परदेशी, सचिन पिरगल, सचिन सगर, सचिन राठोड, संदीप राऊत, सतिष दळवी, प्रकाश जाधव, अजिनाथ जाधव, दिनेश गंगे, दत्तू बेलेकर, ज्ञानेश्वर बेलेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल, मनीषा दहिरे, सपना शिंदे आदींसह होमगार्ड उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा