खर्डा प्रतिनधी:17 सप्टेंबर
स्व. नितीन बापू गोलेकर हे शैक्षणिक क्षेत्रातले संत होते असे उदगार राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केले.
ते स्वर्गीय नितीन गोलेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील,सिताराम गडाचे मठाधिपती महालिंग नगरे महाराज,सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर,प्राचार्य सोमनाथ उगले व श्रीमती जयश्री गोलेकर उपस्थित होते.
ते बोलताना पुढे म्हणाले की स्व. नितीन बापू यांचे कार्य सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेख उल्लेखनीय होते राजकारणात त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता खर्डा सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांनी रयत शिक्षण संस्थेत विविध पदावर काम करून खर्डा भागांमध्ये शिक्षणामध्ये विद्यार्थी घडवण्याचे उत्तम काम केले आहे, खऱ्या अर्थाने ते शैक्षणिक क्षेत्रातले संत म्हणून त्यांची ओळख होती.असे गोलेकर म्हणाले.
यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातून स्व. नितीन बापू गोलेकर यांचे कार्य अधोरेखित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अनेकांना स्व. नितीन बापूंनी केलेल्या कार्याची आठवण काढताना अश्रू अनावर झाले होते.
याप्रसंगी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, चंद्रकांत गोलेकर, ज्ञानेश्वर थोरात, मोहनराव लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, वैजिनाथ पाटील, सुखदेव गेजगे, तुकाराम शिंदे, संचालक सुनील लोंढे,नंदकुमार गोलेकर, गौतम गोपाळघरे, राजेंद्र गोलेकर, सुरेश शिंदे, सुहास पाटील, संजय भाऊसाहेब देशमुख,कल्याण सुरवसे, राजू जीकरे, रमेश गोलेकर, पोपट भुते, राजू डोके, गहिनीनाथ जगताप, ज्ञानेश्वर इंगोले, दत्ता पिंगळे, रामा शिंदे सह पत्रकार दत्तराज पवार , किशोर दुशी व खर्डा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सोसायटीचे व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले यांनी मानले.
No comments:
Post a Comment