खर्डा प्रतिनधी:१७ सप्टेंबर
आपल्या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील व खर्डा परिसरातील नागोबाचीवाडी, ईनामवस्ती व बारगजेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपुर्ण देशभर साजरा होत आहे. त्याच अनुषंगाने आज खर्डा परिसरातील नागोबाचीवाडी, ईनामवस्ती व बारगजेवस्ती येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
यावेळी भाजप कार्यकर्ते बाजीराव गोपळघरे,हरिभाऊ गोपळघरे,नानासाहेब गोपळघरे,बाळासाहेब गोपळघरे,पोपट गोपळघरे,सुग्रीव बारगजे,देविदास बारगजे,रोहिदास बारगजे, नामदेव गोपळघरे,भीमराव गोपळघरे,अंकुश खाडे, राजेंद्र गोपळघरे,ज्ञानोबा खाडे,रामचंद्र गोपळघरे इतर ग्रामस्थ व विविध मान्यवरांसह विद्यार्थी घडवणारे शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नागोबाचीवाडी येथे मुख्याध्यापक पवार सर, बर्डे सर, ईनामवस्ती मुख्याध्यापक कवले सर पांचाळ मॅडम, व कवले मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.
Very nice
ReplyDelete