खर्डा प्रतिनिधी : २३ सप्टेंबर
खर्डा गावापासून तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर गोलेकर लवन, गोपाळवाडा, सुर्वे वस्ती, कानोबा टेकडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गोलेकर लवण या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू करावी. अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केली आहे.
याबाबत अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून साधारणता तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या गोलेकर लवन, गोपाळवाडा, सुर्वे वस्ती, कानोबा टेकडी परिसरात मोठी लोक वस्ती आहे. तेथील विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी तीन किलोमीटर पेक्षा जास्त पायपीट करावी लागते. खर्डा येथून जाणाऱ्या शिर्डी-हैदराबाद महामार्गावर मोठी वाहतूक असते व याच मार्गाने विद्यार्थी शाळेला जातात.
पूर्वी या ठिकाणी शाळा सुरू होती व नवीन इमारतीचे बांधकाम ही झालेले आहे. विद्यार्थी संख्या २० पेक्षा जास्त होईल व तसा प्रस्तावही या शैक्षणिक वर्षाचा सुरुवातीलाच जिल्हा परिषदकडे पाठवलेला आहे.
तरी या भागातील शालेय विद्यार्थ्यांची अडचण पाहता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेकर लवण खर्डा या ठिकाणी शाळा सुरू करण्यास त्वरित मान्यता देऊन शिक्षकांची नियुक्ती व्हावी अशी मागणी विजयसिंह गोलेकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment