जामखेड प्रतिनिधी : २९ सप्टेंबर
प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी नेहमीच तत्परतेने व प्रामाणिकपणे धाऊन येणाऱ्या व प्रत्येक कामाचा पाठपुरावा करणाऱ्या तसेच सर्व शिक्षकांना सोबत घेवून शिक्षकी पेशाची मान उंचावेल असे शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या
प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळाबरोबर जामखेड तालुक्यातील सर्व शिक्षक राहतील असा विश्वास असल्याने
प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळ जामखेड तालुक्यातून ३०० पेक्षा जास्त मतांचा पल्ला नक्कीच गाठेल असे प्रतिपादन तालुक्यातील पहिल्या ISO शाळेचे प्रणेते व शिक्षक नेते एकनाथ (दादा) चव्हाण यांनी व्यक्त केले.
अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँक निवडणुक २०२२ साठी येत्या १६ आक्टोबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जामखेड येथील प्रचार कार्यालयात काल दि. २८ सप्टेंबर रोजी प्राथमिक शिक्षक संघ, गुरूमाऊली मंडळ २०१५ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संघाचे राज्य नेते किसन वराट, केशव गायकवाड, विश्वस्त गोकुळ गायकवाड, बाबा कुमटकर, विकास बगाडे, जालिंदर भोगल, जामखेड तालुका संघाचे अध्यक्ष एकनाथ चव्हाण, गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग मोहोळकर, उपाध्यक्ष नाना मोरे, प्रसिध्दी प्रमुख राजीव मडके, मंडळाचे उपाध्यक्ष अर्जुन पवार, सरचिटणीस रामहरी बांगर, बँकेचे उमेदवार संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते यांच्यासह प्रमुख गुरूमाऊलीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत जामखेड तालुक्यातील ४३९ मतदारांचा आढावा घेण्यात आला.
शिक्षक नेते बापू तांबे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे सर्वसामान्य सभासदांचे जे हित झाले आहे त्यामुळे मतदाराचा १०० टक्के निर्णय झालाय की, या निवडणुकीत गुरुमाऊली २०१५ याच मंडळाला मत देणार.
कारण संघटनेच्या वतीने घेण्यात आलेले खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले
१) ३ टक्के फरकाने बँक चालविण्यासाठी नियम केला, पण प्रत्यक्षात १.७० टक्केच्या फरकानं कारभार.
२) नोकर आकृतिबंध कमी करून बचत केली.
३) नव्याने जरी भरती केली तरी ती करारावर म्हणजे काँट्रॅक्ट बेसिक वर होणार आहे. (शिक्षक सेवक सारखी ५ वर्ष करार)
४) व्याजदर न वाढवता कमी केला. कायमठेवी वर व्याज भरपूर दिले.(शिवाय नियम केला जो बाहेरच्या ठेवी ना व्याज तोच कायम ठेवी ला व्याज)
५) मयत सभासदांबाबत योग्य न्याय.
६)आमसभेत सभासदांच्या निर्णयांना प्रथम प्राधान्य घेऊन सभासद हित साधले.
७) कोणत्याही नेत्यांत मीपणा नाही.
अश्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत.
त्याच बरोबर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळ शिक्षकांच्या विविध प्रश्नांशी नेहमी शिक्षकांच्या मदतीला प्रामाणिकपणे धावून आलेले आहे. शिक्षकाच्या प्रत्येक कामाचा अग्रक्रमाने पाठपुरावा केलेला आहे. त्याच बरोबर शिक्षकी पेशाची मान उंचावेल असे शिक्षण क्षेत्रातील काम सर्व शिक्षकांना घेवून तालुक्यात चालू आहे.त्यामुळे जामखेड तालुक्यातून 300 पल्ला सहज शक्य आहे. हया फक्त हवेतील गोष्टी नाहीत तर त्याचे तंतोतंत नियोजन आहे. भले इतर तालुक्याच्या मानाने मतदान कमी आहे. पण टक्केवारीत आम्ही जिल्हयात एक क्रमांक आहोत. ते कसे त्या गोष्टी सिक्रेट आहेत किंवा आमच्या राजकारणाचा तो एक भाग आहे.असे समजा असे मत जामखेड तालुका प्राथ. शिक्षक संघाचे अध्यक्ष एकनाथ चव्हाण यांनी व्यक्त केले.
बैठकीत किसन वराट,केशव गायकवाड,बाबा कुमटकर,विकास बगाडे, जालिंदर भोगल, राजीव मडके, नाना मोरे, संतोष राऊत, मुंकुंदराज सातपुते या सर्वांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. प्रसिद्धीप्रमुख राजीव मडके यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment