खर्डा प्रतिनधी:२८ सप्टेंबर
कर्जत जामखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खर्डा येथे दिनांक 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे खर्डा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने व खर्डा पत्रकार संघ, व दत्तराज पवार मित्र मंडळातर्फे आयोजन करण्यात आले आहे
आयोजकांकडून प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मोफत पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात येणार आहे रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष असून मागील वर्षी ४५० रक्त बाटल्यांचे संकलन विक्रमी संकलन झाले होते तरुणांचा वाढता प्रतिसाद पाहता यावर्षीही जास्तीत जास्त युवकांनी व महिला,यांनी रक्तदान करावे असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष व खर्डा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा