जवळा प्रतिनधी:२७सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील जवळा या गावांमध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी पद्मविभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उपस्थित होते तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक शेंडे सर हेही उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त आमदार रोहित पवार बोलत असताना सांगितले की डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा गावागावात पोचवली,त्यामुळेच गोरगरिबांचे मुलं आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत व याच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जी मुलं क्लासवन अधिकारी सरकारी अधिकारी व मोठ्या पदावर आहेत ते सर्व डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यावेळेस रयत शिक्षण संस्था ही गावागावात खेड्यामध्ये पोहोचवल्याने हे शक्य झाले.या जयंती निमित्त आमदार रोहित पवार यांनी जवळा विद्यालयात भौतिक सुविधेसाठी आपल्या प्रयत्नातून विद्यालयासाठी संरक्षण भिंत, विद्यार्थ्यांसाठी कमी पडणारे वर्गखोल्या व अशा अनेक विद्यालयातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न शासनाकडून पाठपुरावा करून ते सोडवण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करीन असे सांगितले तसेच तसेच आमदार रोहित दादा पवार यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या तसेच आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना समवेत मैदानी खेळांचा आनंद घेतला.या वेळी कार्यक्रमास उपस्तीत जामखेड पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे उपस्तीत होते तसेच माजी सभापती सुभाष आव्हाड स्कुल कमेटी अध्यक्ष शहाजी पाटील,तसेच जवळा वि.का सेवा संस्थेचे चेअरमन शहाजी (अप्पा)पाटील ,युवा नेते प्रशांत शिंदे, उपसरपंच काका वाळुंजकर, युवा नेते प्रदीप दळवी ,प्रशांत पाटील,राजेंद्र राऊत,किरण पाटील ,ईश्वर हजारे ,शिवानंद कथले, अशोक पठाडे, अविनाश पठाडे, राहुल पाटील,रिजवान शेख ,महावीर पोपळे, गणेश चव्हाण, समीर शेख ,अक्षय वाळुंजकर, इरफान पठाण,भाऊसाहेब कसरे ,रघु मते ,इत्यादी उपस्तीत होते. कार्यक्रममध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव सुपेकर व सोमनाथ नाळे ,यांनी विद्यालयाची चाललेली वाटचाल तसेच विद्यार्थ्यांची होणारी प्रगती या बद्दल प्रस्तावना केली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम शिंदे,येवले यांनी केले व आभार भोंडवे यांनी केले.तसेच थेटे यांनी अनुमोदन दिले तसेच विद्यालयातील सर्वच सेवक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा