जामखेड प्रतिनिधी :१ डिसेंबर
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाईने एच.आय.व्ही./एड्स यांवर पथदर्शी अधिक काम करून चर्चा घडवून आणून आरोग्य विषयी भारतीय नागरिकांच्या मनामध्ये नवा राष्ट्रनिर्माणाचा दृष्टीकोन निर्माण करून एच.आय.व्ही/एड्स संसर्गित व्यक्तीबरोबर'चा कलंक आणि भेदभावाची भावना दूर करूया असे प्रतिपादन जामखेड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी केले.जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालय-स्नेहसक्षम प्रकल्प,१७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. आणि दिशा एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ल.ना.होशिंग ज्यू.कॉलेजच्या डॉ.अब्दुल कलाम सभागृह येथे जाणीव जागृती कार्यक्रम आणि शहरात काढण्यात आलेल्या एच.आय.व्ही./एड्स रॅली'ला संबोधीत करतांना ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक वाघमारे,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर,वकील संघाचे अध्यक्ष संग्राम पोले,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,
स्नेहज्योत प्रकल्प क्षेत्रिय अधिकारी मजहर खान,प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपप्राचार्य पी.पी.जरे,विधी व सेवा प्राधिकरणचे ऍड.पी.एम.कात्रजकर,प्राचार्य बी.के.मडके,श्याम जाधवर,
एन.सी.सी.विभाग प्रमुख कॅप्टन गौतम केळकर,सेकंड ऑफिसर अनिल देडे,थर्ड ऑफिसर मयूर भोसले,ऍड.नागरगोजे
यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत स्नेहालयचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले म्हणाले की; एच.आय.व्ही./एड्स बाबत तरुणांईमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे.त्यासाठी स्नेहालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या माध्यमातून "आपली एकता, आपली समानता" हे ब्रीद घेऊन गेल्या तीन दशकांपासून स्नेहालय यावर जनजागृती करत आहे.महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर एक पथदर्शी काम स्नेहालय'ने उभे केले आहे.एच.आय.व्ही.एड्स'चा प्रसार रोखण्यासाठी अतिजोखिमचे वर्तन असणारे भागांमध्ये जाणीव जागृतीचे काम करते आहे.महिला,बालकांच्या आणि संसर्गित व्यक्तींच्या अधिकारांच्या प्रश्नांवर स्नेहालय नेहमीच आग्रही भूमिका घेते.एच.आय.व्ही.चा समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकाधिक तरुणांईने पुढे यायला हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पुढे बोलतांना न्यायाधीश जगताप म्हणाले की;जागतिक स्तरावरील विचार करता एच.आय.व्ही./एड्स संसर्गित व्यक्तींसाठी कलंक आणि भेदभाव टाळून समानतेचा धागा पकडून ज्ञानाचा प्रसार करून एड्सला आळा घालण्यासाठी प्रतिबंध आणि लोकांमध्ये जनजागृती हाच मार्ग आहे.आजच्या इंटरनेट च्या महाजालात तरुणाईने वाहवत न जाता त्याचा उपयोग समाजहितासाठी करावा.भारतीय राज्यघटनेने बहाल केलेले समानतेचे अधिकार अंगिकारून आदर्श नागरिक बनून लोकशाही बळकट करूया.यांवर गेल्या तीन दशकांमध्ये स्नेहालय संस्थेने यावर पथदर्शी काम उभे केले आहे तरुणाईने याचा आदर्श घेऊन जाणीव जागृतीच्या या कामात स्वतःला झोकून देऊन या विधायक कार्यात सहभागी व्हायला हवे असे ते म्हणाले.यावेळी स्नेहालयाच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले.यावेळी तालुका आरोग्य अधिकरी डॉ.सुनील बोराडे यांनी क्रयशक्ती असणाऱ्या तरुणांची जबरदार लैंगिक वर्तन,जागतिक स्तरावरील आकडेवारी,एड्स'ची सामाजिक भिषणता यांवर भाष्य केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक वाघमारे यांनी ध्येयासक्त तरुणाईला आरोग्य विषयी सजग राहून एच.आय.व्ही सांसर्गित व्यक्तींना समता आणि समानतेची वागणूक देऊन सेवा आणि परिवर्तनाचे कार्य करत राहूया असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांना एड्स प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रॅली'ला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली.या रॅलीत
स्नेहज्योत क्षेत्रिय अधिकारी मजहर खान,आय.सी.टी.सी.चे श्याम जाधवर,जामखेड महाविद्यालय,रयत शिक्षण संस्थेचे श्रीनागेश विद्यालय,ल.ना.होशिंग विद्यालयाचे एन.सी.सी.कॅडेटसह विध्यार्थी-विध्यार्थिनींसह आशा स्वयं सेविका,गतप्रवर्तक,तसेच इतर स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मझहर खान,रोहित होडशील,मोहित कदम,प्रा.संकेत पवार,प्रा.प्रल्हाद साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे १७ महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर करणारी चेतन गुरुपक्ष,ऍडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंग यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती सरडे यांनी तर आभार प्रदर्शन मजहर खान यांनी केले.
No comments:
Post a Comment