जामखेड प्रतिनिधी : १ डिसेंबर
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अक्षेपाहार्य रित्या वक्तव्य केल्याबद्दल आरपीआयचे (आठवले गट) रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड यांचा जामखेड येथे निषेध करण्यात आला.
याबद्दल सोशल मिडीयावर एक अॅडिओ क्लिप व्हायरल होत असून या व्हायरल क्लिपमुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने जामखेड येथिल कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन भीम टोला सामाजिक संघटना व बौद्ध बांधवांच्या वतीने
निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भीम टोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, प्रमुख वंचित बहुजन कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष . देवा रावसाहेब मोरे, नायगावचे माजी सरपंच शिवाजी ससाणे, पाटोदा येथील माजी सरपंच जोगेंद्र थोरात. सुर्यकांत सदाफुले, सुजीत धनवे, गणेश घायतडक, अनिल जावळे, विजय रणसिंग, मल्हारी सदाफुले, पंडित गायकवाड, विष्णू घायतडक यांच्या सह्या आहेत.
निषेधाचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे व सपोनि सुनील बडे यांना देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment