जामखेड प्रतिनिधी : २४जानेवारी
आपल्या पतीचे हार्नियाचे आॅपरेशन करण्यासाठी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आपल्या आजोळी जात असलेल्या फिर्याद माया राम बोराटे या बारामतीहून जालन्याकडे जाणाऱ्या बसमधील कोणीतरी आज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ७००० रूपये चोरी केल्याची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दिली. फिर्याद देताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुत्रे हालवून जामखेड पोलीसांनी गुन्हातील आरोपी महिलेस आवघ्या एका तासात अटक करून तीच्याकडून चोरलेली ७००० हजार रूपयांची रक्कमही हस्तगत केली आहे. या दमदार कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सविस्तर असे की, यातील फिर्यादी माया राम बोराटे, (वय ४५), रा. खंडोबा नगर मोरगाव नाका बारामती, या आपले पती रामा बोराटे यांचेवर उपचार करणे कामी आजोळी खर्डा येथे आज दि. २४ जानेवारी रोजी सकाळी११:३० वाजताचे सुमाराला बारामती ते जालना बस क्रमांक एम एच 11 टी- 9279 ह्या गाडीमधुन फिर्यादी माया बोराटे व त्यांच्या सासू, आई असा प्रवास करत असताना जामखेड बस स्थानक येथे २: ०० वाजताचेच सुमा बसमधुन उतरत असताना, फिर्यादी यांच्या पर्स मधील पाकीट कोणीतरी अज्ञात चोरट्याने घेवुन गेले. त्यावेळी मी आजुबाजुला शोध घेतला असता माझ्या पर्समधील पाकीटात रोख रक्कम ७००० रुपये होतो. ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीतून उतरत असताना चोरल्याचे त्यांची खात्री झाली. त्यानुसार जामखेड फिर्यादी माया राम बोराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटय़ा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सुत्रे हालवून जामखेड पोलीसांनी गुन्ह्यातील महिला चोर सुनिता रामेश्वर भोसले, रा. कानडी, ता. आष्टी, जिल्हा बीड हीला आवघ्या एक तासात अटक करून तीच्याकडून चोरीस गेलेले ७००० रूपये हस्तगत केले आहेत.
ही तत्पर कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजय साठे, हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, पोलीस काॅन्स्टेबल विजय कोळी, आबासाहेब आवारे, पी. के. पालवे, महिला पोलीस काॅन्स्टेबल अनिता घोगरे यांनी केली आहे. तर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अजय साठे हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा