जामखेड प्रतिनिधी : २४ जानेवारी
जामखेड येथे सालाबाद प्रमाणे दि. २६ जानेवारी रोजी १० वा संविधान महोत्सव साजरा करण्यात येणार असून इतर नियोजीत कार्यक्रमांबरोबरच वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांना होणार पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत देशाला संविधान बहाल केले. त्या संविधानाची २६ जानेवारी १९५० रोजी अंमलबजावणी झाली व देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नागरिकत्वाचा अधिकार मिळाला.
याचीच जाणीव ठेवून जामखेड शहर व तालुक्यातील समस्त भिमसैनिक व समाज बांधवांच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून जामखेड शहरात मोठय़ा उत्साहात संविधान महोत्सव साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने याही वर्षी जामखेड शहरातील बाजारतळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर येथे
सकाळी ११.३० वा. - भारतीय संविधान प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन दुपारी १२.०० वा. - महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे व आयु. विशाल चव्हाण यांचा क्रांतीकारी विचारांचा जलसा. तसेच कार्यक्रमापूर्वी सकाळी १०.०० वा. - "भव्य मोटारसायकल रॅली" व कार्यक्रमानंतर भोजन व्यवस्था केली आहे.
सकाळी ११ :०० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी खा. सुजय विखे, आ. राम शिंदे, आ. रोहित पवार, आ. निलेश लंके, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवेंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये डॉ. फारूक शेख (वैद्यकीय), पत्रकार नासिर पठाण (पत्रकारिता), मुकुंद राऊत (शैक्षणिक), अमित गंभीर (सामाजिक), पंडित मोरे (धार्मिक) या मान्यवरांचा सामावेश आहे.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व संविधान प्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने संविधान महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा