कर्जत-जामखेड मतदारसंघातील सामान्य नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडवण्यासाठी आ. रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार असताना वेळोवेळी प्रयत्न करून नवीन वीज उपकेंद्र तसेच लिंक लाईन याबाबत शासनस्तरावरून विविध मंजूरी मिळवल्या होत्या. त्यापैकी काही उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कर्जत तालुक्यातील घुमरी येथील २ कोटी २ लाख रुपये किमतीच्या ३३/११ केव्ही (5-MVA) नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन नुकतेच आ. रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले.
घुमरी येथे नवीन वीज उपकेंद्र झाल्यामुळे परिसरातील घुमरी, थेरगाव, निमगाव गांगर्डा, बेलगाव व नागमठाण या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून ६ गावांवर पूर्वी येणारा ताण देखील पूर्णपणे कमी होणार आहे व सध्याच्या ५ गावात पूर्ण आणि उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून लिंक लाईन व उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून अनेक कामांना गती देखील मिळाली आहे. त्याचबरोबर राशीनमध्ये असलेल्या सबस्टेशनची क्षमता वाढवण्याची परवानगीही आमदारांनी मिळवली आहे त्याचे कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. ज्यामुळे उपकेंद्रावर आलेला ताण कमी होऊन अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होईल.
आज घुमरी येथे नवीन उपकेंद्राचे भूमिपूजन पार पडले असून दोन्ही तालुक्यातील मिळून नायगाव, दिघोळ, चीलवडी व चौंडी येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून नवीन वीज उपकेंद्र मंजूर असून त्यापैकी नायगाव उपकेंद्राचे काम पूर्ण होऊन ते सुरू देखील झाले आहे. आणि इतर निविदा स्तरावर आहेत. याशिवाय राशीन, मिरजगाव, कुळधरण, भांबोरा आणि खांडवी येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्याला देखील शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी राशीनच्या कामाचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.
यासोबतच कर्जत तालुक्यातील ३३/११ पाटेवाडी सबस्टेशन येथे ओव्हरलोडींगमुळे आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यामुळे आमदार निधीतून पाटेवाडी सबस्टेशन येथे ३ किलोमीटर लिंक लाईनचे काम देखिल पूर्वीच पूर्ण झाले आहे. नवीन उपकेंद्रामुळे सध्याच्या उपकेंद्रांवर आलेला ताण कमी होण्यास मदत होणार असून त्यावर अवलंबून असणाऱ्या गावांची विजेची अडचणही कायमची दूर होणार आहे.
No comments:
Post a Comment