खर्डा प्रतिनधी/१० मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दि 13 मार्च रोजी श्री.कानिफनाथ यात्रा आहे त्याच पार्श्वभूमीवर खर्डा पोलीस स्टेशनने आज दि 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटी बैठकीचे आयोजन केले असून खर्डा पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खर्डा पोलिसांकडुन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खर्डा येथे श्री. कानिफनाथ ची यात्रा असल्याने खर्डा येथे यात्रेनिमित्त भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते,खर्ड्यात बारा वाड्यातून नागरिक महिला यात्रेला येत असतात. जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा खर्डा येथे भरते व या यात्रेकरिता नागरिक मुबंई, पुणे, नाशिक,औरंगाबाद येथून येत असतात त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात असते कुठलाही अनुचित .प्रकार घडू नये यात्रेमध्ये शांतता भंग होऊ नये , कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज दिनांक 10 मार्च रोजी खर्डा पोलीस स्टेशनने कानिफनाथ यात्रेनिमित्त आज सायंकाळी 6 वाजता शांतता कमिटी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत नागरिकांच्या सहभागामुळे यात्रा शांततापूर्णपणे पार पडेल.
तसेच खर्डा व पंचक्रोशीतील नागरिकांनी , तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खर्डा पोलिसांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा