खर्डा प्रतिनधी/१०मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील बांधखडक येथे जालिंदरनाथ यात्रेनिमित्त रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा मोफत लोकनाट्य तमाशा कार्यक्रमाचे आयोजन वणेवेवस्ती बांधखडक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.बुधवार दि.१२ मार्च रोजी संध्याकाळी ८.३० वाजता वणवेवस्ती बांधखडक येथे असून खर्डा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना या कार्यक्रमाचा मोफत लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बांधखडक ग्रामस्थ वनेवस्तीच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम स्थानिक संस्कृतीचा प्रसार आणि सामाजिक एकत्रीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे.यामुळे स्थानिक संस्कृतीचा प्रसार आणि सामाजिक एकत्रीकरण वाढेल.असे बांधखडक ग्रामस्थांकडुन सांगण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा