पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २७ फेब्रुवारी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नको वेतन हवे,
सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन, व नियमानुसार ग्रॅच्युईटी मिळावी, अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवूव इतर निकष परिस्थितीनुसार शिथील करणे, अंगणवाडीमधील बालकांना देण्यात येणाऱ्या पुरक पोषण आहाराच्या रक्कमेमध्ये वाढत्या महागाईनुसार वाढ करणे. अंगणवाडी सेविकांना कार्यक्षम मोबाईल देण्यात यावेत व त्यांच्या वैयक्तीक मोबाईलवर माहिती भरण्याची सक्ती करु नये व पोषण ट्रॅकर अॅप संपूर्णपणे मराठी भाषेत देण्यात यावे. सेवानिवृत्त व मृत पावलेल्या कर्मचा-यांचे थकित सेवासमाप्ती लाभ विनाविलंब द्यावेत, दुर्गम व अतिदुर्गम प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासुनचे थकित प्रोत्साहन राशी देणे, ५ व १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासुन दरमहा ३१ व ६३ रु. देणे, मोबाईल रिचार्जचे दर वाढविणे, परिवर्तन निधीची रक्कम वाढविणे, २०२१ व २०२२ वर्षाची उर्वरित उन्हाळी रजा देणे, मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांएवढे मानधन व परिवर्तन निधी देणे, नव्याने विकसीत होणा-या शहरांमध्ये लोकसंख्या झपाटयाने वाढत असल्यामुळे ८०० ते १००० लोकसंख्येला १ अंगणवाडी केंद्र हे प्रमाण कायम ठेवावे व ज्या अंगणवाडी क्षेत्रातील लोकसंख्येत वाढ झाली आहे तेथे नवीन अंगणवाडी केंद्र उघडण्यात यावे, अश्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी संघटना, जनशक्ती, यांनी संपुर्ण महाराष्ट्रात पुकारलेल्या अंदोलनात सहभागी होत जामखेड येथील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या जामखेड शाखा तसेच जामखेड तालुक्यातील साईश्रध्दा कृती समीतीच्या वतीने तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती जामखेड शाखेच्या तालुका अध्यक्षा पुजा अनिल गाडेकर, सचिव इंदूबाई थोरात तसेच शैला आबा सदाफुले, सुरेखा शिंदे, शितल जायभय, शुभांगी राऊत, तर साईश्रध्दा कृती समीती जामखेड तालुका या संघटनेच्या तालुका अध्यक्षा सविता रावसाहेब ढवळे, सचिव आयशा अखिल शेख तसेच अर्चना संदिप खर्डे, संगीता विजय सुरवसे, संगीता अभिमान गायकवाड, यास्मीन अहमद खुरसान यांच्यासह तालुक्यातील सर्वच ४०० आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या अंदोलनात सहभाग घेतला आहे. तसेच जामखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालया समोर करण्यात आलेल्या अंदोलनावेळीही सर्व संघटनांच्या आंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समिती, अंगणवाडी कर्मचारी संघटना, जनशक्ती, आयटक, म. रा. अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, अंगणवाडी कर्मचारी सभा हाऊस, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघ, पूर्व प्रा. सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघ, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन अशा विविध संघटनांनी उद्या दि. २८ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंदोलन सहभागी होण्यासाठीही मोठ्या संख्येने जाणार असल्याची माहिती उपस्थित पदाधिकारी आंगणवाडी संघटनांच्या वतीने देण्यात आली आहे.
या बाबत आज दि. २७ फेब्रुवारी रोजी जामखेड येथील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन या अंदोलनाची सुरूवात करण्यात आली. यानंतर जामखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत सर्व संघटनांच्या पदाधिकारी व सभासद आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लाक्षणिक अंदोलन करून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ज्योती बेल्हेकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे अंदोलन सुरूच राहील असा निर्धार या वेळी करण्यात आला. यावेळी आंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सरकार विरोधी दिलेल्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.
तसेच आपल्या मागण्या शासनाकडे पोहोचवल्या जातील तसेच शासनाकडून येणाऱ्या सुचनाची योग्य ती अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment