पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २६ फेब्रुवारी
मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार खर्डा किल्ल्याच्या इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान. या ऐतिहासिक गावात आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून केलेली विकासाभिमुख कामे. गेल्या वर्षी उभारलेला ऐतिहासिक भगवा स्वराज्य ध्वज. तसेच शेतकऱ्यांसाठी नुकतंच तयार केलेले गोडाऊन. गावाला असलेल्या १२ वेशींपैकी शिल्लक राहिलेल्या दोन वेशींपैकी एका वेशीचा केलेला जीर्णोध्दार. शाळांची केलेली सुसज्ज कामे अशी ७५ कोटींची कामे गावात केली आहेत. यापैकी काही पुर्ण तर काही प्रगतीपथावर आहेत. या सर्व कामांची दखल घेऊन नगर जिल्ह्य़ातील वृत्तपत्र क्षेत्रात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या दैनिक अजिंक्य भारतने 'अजिंक्य कारभारी २०२३' हा पुरस्कार देऊन केलेला गौरव हा खरचं अभिमानास्पद असून इथून पुढे आणखी काम करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळाली आहे. असे मत सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी व्यक्त केले
खर्डा शहराच्या विकासासाठी आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली केलेल्या कामांबाबत सा. पोलीस वारंट मध्ये प्रसिद्ध केलेली मुलाखत..
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कर्तृत्ववान सरपंचांना दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राने 'अजिंक्य कारभारी २०२३' हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. पहिल्याच वर्षीच्या या पुरस्कारासाठी निवड समितीने खर्डा गावच्या सरपंच आसाराम गोपाळघरे यांची निवड केली शनिवार, दि. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी अहमदनगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरपंच आसाराम गोपाळघरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'अजिंक्य कारभारी २०२३' पुरस्कार मिळालेबद्दल सरपंच आसाराम गोपाळघरे यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
No comments:
Post a Comment