पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २३ एप्रिल
एकिकडे उन्हाळा असह्य होत असताना तो सुसह्य व्हावा यासाठी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले व संवेदनशील मनाचे मैत्री ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष सागर दादा गवसने (मराठा) यांच्या वाढदिवसानिमित्त राशीन येथील संकल्प वस्तीगृहातील अनाथ मुलांसाठी कुलरची अनोखी भेट आहे.
काल दि. २२ रोजी विविध ठिकाणी सागर दादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने अशा कडक उन्हाच्या झळा सुसह्य व्हाव्यात या हेतूने मैत्री ग्रुप तर्फे राशीन येथील संकल्प वस्तीगृह अनाथ मुलांसाठी तीन कुलरच भेट देण्यात आले करण्यात यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने सागर दादाही आनंदून गेले. या कार्यक्रमासाठी संदीप उबाळे उर्फ डॉन (भाजप विद्यार्थी विभाग जिल्हाध्यक्ष बीड), हरिभाऊ कानगुडे, वैभव काळे (सरपंच करपडी ), शक्ती उर्फ रमेश मासाळ सर, सुरेश नाना कानगुडे, सचिन साळवे (मनसे अध्यक्ष राशीन), निखिल काळे, आधी रामभाऊ जाधव, अजिनाथ शेटे, बिभीषण मोहिते, (संचालक विविध कार्यकारी सोसायटी करपडी), विश्वास डमरे (सरपंच बेनवडी) हरिभाऊ गदादे, अनिल माने, सागर सुरवसे, संदीप पानसरे, बाळा कांबळे, संदीप शिंदे पुणे, गणेश शेट्टी, तसेच छायाचित्रकार कृष्णा राऊत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवसाला होणारा खर्च टाळून वस्तीगृहासाठी कुलर देण्याचा कार्यक्रम पार पडला. या पुर्वीही सागर दादा गवसने (मराठा) यांनी स्व.पै. ओम शाम कानगुडे यांच्या स्मरणार्थ पाण्याचे फिल्टर या वस्तीगृहात दिलेला आहे.
यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थी व वस्तीगृहाचे संचालक विजय अरुण भोसले यांच्यातर्फे सागर दादा गवसने (मराठा) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून सागर दादांनी वस्तीगृह दिलेले कुलर फिल्टर याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment