पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१एप्रिल
खर्डा भागातील पर्यटन दृष्ट्या विविध प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीसह अनेक विषय व महत्त्वपूर्ण बातम्यांनी नटलेल्या पोलीस वारंट डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांकांचे अनावरण जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .जामखेड पोलीस स्टेशन येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड , ठाणे अंमलदार, राहुल हिंगसे , सचिन पीरगळ , प्रवीण पालवे , नवनाथ शेकडे आदी पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते
पोलीस वारंटच्या विविध विशेषांतून नेहमीच विविध अशा सामाजिक व समाजाच्या विविध विषयांचा आढावा व मार्गदर्शनपर विषय असतात. या विशेषांकात विशेष लेखांक, खर्डा परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील प्रयत्न करण्याची सचिन सर गायवळ यांची मुलाखत .महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत. खर्डा येथून प्रकाशित होणाऱ्या या व राज्यातील सर्व जिल्हात वितरित होणाऱ्या पोलीस वारंट च्या डॉ .बाबासाहेबआंबेडकर जयंती निमित्त काढलेल्या विशेषांकांचे सर्व स्तरातून उत्स्फूर्त स्वागत झाले.
No comments:
Post a Comment