पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २१ एप्रिल
नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते बबलू (अण्णा) सुरवसे यांची खर्डा येथील वडार समाजाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड मांढरदेवी नवरात्र उत्सव मंडळ खर्डा व शिवपट्टण जय बजरंग तरुण मंडळ खर्डा यांच्या वतीने निवड करण्यात आली. तसेच यावेळी मच्छिंद्र येवले यांचीही उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा खर्डा येथील जय बजरंग चौकात सत्कार करण्यात आला. सर्व वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बबलू अण्णा सुरवसे हे नेहमीच सामाजिक कामामध्ये सक्रिय असतात. याचा विचार करून खर्डा येथील मांढरदेवी नवरात्र उत्सव मंडळ व शिवपट्टण जय बजरंग तरुण मंडळ यांनी त्यांची खर्डा येथील वडार समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे खर्डा येथील वडार समाज्याचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.
No comments:
Post a Comment