पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १७ एप्रिल
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील कारंडे वस्ती येथे राहणारे मयत नवनाथ योगिराज कारंडे (वय ४७), या इसमाने कवडगाव शिवारात म्हसोबाचे शेतात खबर देणारे यांच्या बोरीच्या झाडाला केबलच्या सहाय्याने १७ एप्रिल रोजी १२:४५ वाजताचे पुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर मयत नवनाथ योगिराज कारंडे यांचा मृतदेह पुढील उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी सदर व्यक्ती मयत झाल्याचे घोषित केले. त्यानुसार मयत नवनाथ कारंडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह अंतिमसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेची खबर योगिराज भानुदास कारंडे ६५ यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुक्तार कुरेशी हे करत आहेत.
आज दि. १७ एप्रिल रोजी जामखेड तालुक्यात दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील कारंडे वस्ती येथे राहणारे मयत नवनाथ योगिराज कारंडे (वय ४७) तर जामखेड शहरातील प्रशांत नेटके या ३४ वर्षीय अविवाहित तरूणाची शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
No comments:
Post a Comment