पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १७ एप्रिल
जामखेड येथील केबल नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या व शहरातील रमेश खाडे नगर येथे राहणाऱ्या प्रशांत बाळासाहेब नेटके या ३४ वर्षीय तरूणाने याने रात्रीच्या सुमारास जमादारवाडी शिवारातील
आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जमादारवाडी व जामखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
असून जामखेड येथील जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन अंतिम संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची खबर आशोक दत्तु नेटके यांनी दिली असून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment