पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ जुलै
कर्जत जामखेडचे आमदार आ.रोहित पवार यांचे पुण्यातील सृजन हाऊस या हडपसर येथील कार्यालयावर काल शनिवारी दि. १५ जुलैच्या रात्री पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन
मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास २-३ अज्ञातांनी हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसून कार्यालयात खाली असलेल्या काही वस्तूंचे व खाली उभे असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात स्वतः आ. रोहित पवार यांनी पोलीसात तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहेत.
आ. रोहित पवार यांचं हडपसर येथील सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. याच ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वॉचमनचे आणि आरोपींचे वैयक्तिक वादामुळे हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेत रोहित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या आतील बाजूस आणि बाहेरील बाजूस काहीही झालेलं नाही असे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment