पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१८ सप्टेंबर
पिंपरखेड हळगावसह इतर वीस गावांना शेतीला आठ तास वीजपुरवठा व सिंगल फेज कायम चालू रहावे यासाठी पंचायत समितीचे माजी उप सभापती अंकुशराव ढवळे यांनी हळगाव येथे सुरू केलेले उपोषण तहसीलदार व महावितरण अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
जामखेड तालुक्यातील अरणगाव पंचायत समिती गणात मागील दहा वर्षांपासून शेतीपंपासाठी व घरगुती सिंगल फेज वीज वितरण एक दिवसाआड होत असल्याने पिकांचे नुकसान व नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. शेतीला आठ तास व सिंगल फेज चोवीस तास वीज मिळण्यासाठी हळगाव येथे दि. १७ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे माजी उपसभापती व बाजार समितीचे संचालक अंकुशराव ढवळे व शेतकरी उपोषणास बसले होते.
सदर निवेदनाची दखल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. राम शिंदे, खासदार सुजय विखे आ. रोहित पवार यांनी घेउन वरिष्ठ अधिकारी यांना सुचना केल्या त्यानुसार तहसीलदार योगेश चंद्रे, महावितरणचे किसन चेचरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सदर
सदर गावांना आठ तास अखंडित सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी, चोंडी येथे नवीन 33 /११ उपकेंद्र RDSS योजनेअंतर्गत प्रस्तावित आहे. तसेच शेती वाहिनीचे भारनियमन ठरवणे हा कंपनीचा धोरणात्मक निर्णय असून तो या कार्यालयाच्या अख्यातरीत येत नाही. आपल्या मागणीप्रमाणे वरील दोन्ही बाजूस आठ आठ तास वीजपुरवठा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाम प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले यानंतर अंकुशराव ढवळे व शेतकरी सखाराम भोरे रविराज ढवळे, किसनराव ढवळे, शिवाजीराव ढवळे, नवनाथ ढवळे गा.प सदस्य हनुमंत निकम, पाराजी ढवळे, आनंदराव भापकर, विशाल गाडेकर, महादेव ढवळे, दिपक ढवळे, महेश ढवळे, सुरेश ढवळे, पंडीत ढवळे, अक्षय आमटे, राहुल पुराणे, बबन पाचरणे, महादेव रधवे, सुरेश कांकरियका, समशाबुदिन शेख, रवी पुराणे, दादासाहेब पुराणे, बाळासाहेब पुराणे हसन शेख आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment