पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ सप्टेंबर
जामखेड शहरातील खर्डा चौक येथे दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांचे स्वागत कार्यक्रमामध्ये यातील फिर्यादी सुहास दादासाहेब वारे यांच्या गळयातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेली या जामखेड पोलीसात दाखल गुन्हाचा तपास करीत असताना दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३२) व अशोक बबन जाधव (वय २९) दोघे रा. पेठ जिल्हा बीड हे अट्टल गुन्हेगारच या घटनेतील आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने १ लाख २५ हजारांच्या मुद्देमालासह दोघांनाही अटक करण्याची दमदार कामगिरी जामखेड पोलीसांकडून करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर असे की, राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांनी संपुर्ण राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली होती. त्यानिमित्त भाजपाच्या वतीने दि. ९ सप्टेंबर रोजी जामखेड शहरातील खर्डा चौकात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. याच कार्यक्रमातील गर्दीचा फायदा घेऊन या घटनेतील फिर्यादी सुहास दादासाहेब वारे (वय ४०) रा. रत्नापूर ता. जामखेड यांच्या गळयातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरुन जामखेड पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. ४२९/२०२३ भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर ठिकाणी खर्डा चौक येथे लोकांचे गर्दीमध्ये लोकांचे खिशे, पाकीट चाचपडताना दोन संशयित इसमांना ताब्यात घेवुन चौकशीकामी जामखेड पोलीस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ वय ३२ वर्षे, २) अशोक बबन जाधव वय २९ वर्षे दोघे रा. पेठ बीड ता. जि. बीड असे असल्याचे सांगितले. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना दि. ०९/०९/२०२३ रोजी सदर गुन्ह्यात अटक करुन पोलीस कस्टडी रिमांड घेवुन ते आज पावेतो पोलीस कस्टडी मध्ये आहेत. त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेली अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन अंदाजे १,२५,०००/- रुपये किं.ची हस्तगत केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल प्रविण इंगळे हे करीत आहेत.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी नामे दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ वय ३२वर्षे, रा. बलभिमनगर, पेठवीड ता. जि. बीड याचे विरूध्द दाखल गुन्हे
१) चिंचणीवांगी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२/२०१८ भादवि कलम ३७९ प्रमाणे
२) कारंजासीटी पोलीस स्टेशन गु.र.नं. १२०/२०१६ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे
३) निलंगा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३/२०१६ भादवि कलम ३७९ प्रमाणे ४) गांधीचौक पोलीस स्टेशन, लातुर गु.र.नं. २०३/२०१३ भादवि कलम ३७९ प्रमाणे
५) हिंगोली तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४/२०१४ भादवि कलम ३७९ प्रमाणे
६) उस्मानाबाद सिटी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९/२०१० भादवि कलम ३७९ प्रमाणे
७) हिंगोली तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. १७७/२०११ भादवि कलम ३७९ प्रमाणे
आरोपी नामे अशोक बबन जाधव वय २९ वर्षे, रा. पेठबीड ता.जि.बीड याचे विरूध्द दाखल गुन्हे
१) बीड ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं. १४८ / २०२१ भादवि कलम ३९९,४०२, आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे २) पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक गु.र.नं. ३४९/२०१६ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे ३) कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर गु.र.नं. ४९८ / २०१९ भादवि कलम ३७९,२३४ प्रमाणे
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस हेडकॉन्टेबल प्रविण इंगळे, पोलीस नाईक संतोष कोपनर, पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश मांडगे, देविदास पळसे, कुलदिप घोळवे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment