दिराने काढला भावजयीचा काटा, जामखेड पोलिसांकडून दिरासह पती अटक - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३

Home जामखेड पोलीस स्टेशन दिराने काढला भावजयीचा काटा, जामखेड पोलिसांकडून दिरासह पती अटक

दिराने काढला भावजयीचा काटा, जामखेड पोलिसांकडून दिरासह पती अटक

मंगळवार, ऑक्टोबर १०, २०२३ जामखेड पोलीस स्टेशन,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१० ऑक्टोबर

जामखेड तालुक्यात एका महिलेच्या खुनाची धक्कादायक घटना घडली असून पत्नीने घरात किराणा आणण्यासाठी पतीच्या खिशातील चारशे रुपये काढण्याच्या कारणावरून पतीपत्नीत झालेल्या झटापटीत पत्नीने पतीच्या तोंडावर चापट मारल्याचा राग येऊन दिराने भावजयीला लाकडी ढपलीने जबर मारहाण केल्याने त्या मारहाणीत ती मृत्यूमुखी पडल्याच्या कारणावरून मयत महिलेचा दिर व पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
    सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील साकत येथील या घटनेतील मयत भाऊजय सिमा बाळू घोडेस्वार (वय ३५) ही 
घरातील किराणा संपला म्हणून तो आणण्यासाठी पैसे नसल्याने आपल्या मुलीला सोबत घेत पती बाळू अरूण घोडेस्वार हा बसलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या खिशातून चारशे रुपये काढून घेतले. यावेळी पती-पत्नीत झटापट झाली व पतीने शिवीगाळ व मारहाण केली तेंव्हा मयत सीमानेही पतीच्या तोंडात चापट मारली. याचा राग मनात धरून दिराने घरी येत भावजईला शिवीगाळ करत ढपलीने डोक्यावर व पाठीवर मारहाण केली. व तो तिथून निघून गेला. दिराने केलेल्या मारहाणीत मयत सिमा ही गंभीर जखमी झाल्याने शेजाऱ्यांनी तीला जामखेड येथील दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
    या बाबत मयत सिमा हिचे वडील फिर्यादी राजेंद्र आश्रुबा सरोदे (वय ५९), रा. पारगाव घुमरा ता. पाटोदा जि. बीड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  माझी मुलगी सीमा हिचे १५ वर्षांपूर्वी बाळू अरूण घोडेस्वार याच्याशी लग्न झाले होते. बाळू यास दारूचे व्यसन आहे. गेल्या सात आठ वर्षापासून पती बाळू व दिर अतुल हे दोघे सीमास माहेरून पैसे आण म्हणून मानसिक व शारीरिक छळ करत होते. मारहाण करत होते. तसेच अनेक वेळा उपाशी पोटी ठेवत होते. असे ती माहेरी आल्यावर सांगत असायची.
      काल दि. ८ रोजी रात्री माझी नात दिक्षा हिचा फोन आला व तीने रडायला सुरूवात केली आणि सांगितले की, अंकलने मम्मीला खुप मारले आहे. ती बेशुद्ध पडली आहे. यामुळे मी व माझा मुलगा तातडीने साकतला आलो. आल्यावर आम्हाला समजले की, सीमाला अंकुश घोडेस्वार व इतर नातेवाईकांनी जामखेडला दवाखान्यात नेले आहे. आम्ही ताबडतोब जामखेड येथील सहारा हाँस्पिटलला आलो. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की डोक्याला खुप मार लागला आहे. रक्तस्राव होत आहे पेशन्टला नगरला हलवावे लागेल. आमच्या कडे पैसे नसल्याने आम्ही सरकारी दवाखान्यात आणले तर तेथील डॉक्टरांनी सीमाला मृत घोषित केले. त्यानुसार सीमावर साकत येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावरून फिर्यादी राजेंद्र आश्रुबा सरोदे (वय ५९), यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती बाळू अरूण घोडेस्वार व दिर अतुल अरूण घोडेस्वार यांच्यावर भादवी ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आले आहे. या घटनेमुळे साकत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 
  घटनेची माहिती समजताच जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती,पोलीस नाईक कोपनर,  जितेंद्र सरोदे, पोलीस काॅन्स्टेबल प्रवीण इंगळे, प्रकाश मांडगे, कुलदीप घोळवे, पळसे, देशमाने,  नवनाथ शेकडे,  या पथकाने काही तासातच तातडीने कारवाई करत आरोपी अतुल अरूण घोडेस्वार व बाळू अरूण घोडेस्वार यांना अटक केली आहे. .
Tags # जामखेड पोलीस स्टेशन
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

जामखेड पोलीस स्टेशन
Posted at मंगळवार, ऑक्टोबर १०, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

आ. राम शिंदे खर्ड्याच्या किल्ल्यावर समोरासमोर चर्चेला या मी पाठपुरावा केलेली कागदपत्रे घेऊन येतो. "होऊन जाऊ द्या दुध का दुध और पाणी का पाणी" - आ.रोहित पवार

खर्डा शहरात धार्मिक पर्यटनाला चालना; आमदार रोहित पवार यांच्याकडून लक्ष्मी आई मंदिराच्या सभामंडपाकरिता १ लाखाची मदत, सभामंडपाचे काम सुरू

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *