पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२५ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सीताराम गडाच्या परिसरात सीताराम गडाचे महालिंग नगरे महाराज व सरपंच सौ .संजविनी पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पुजा करून उद्घाटन करण्यात आले. ही रुग्णवाहिका जनतेच्या अहोरात्र सेवेत राहणार आहे "रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा "असे प्रतिपादन डॉ.लाड यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केले आहे .
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी डॉ .लाड यांचे कौतुक करून त्यांच्या हातून असेच चांगले काम घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या . ते म्हणाले आपल्या परिसरामध्ये कित्येक दिवसांपासून आपत्कालीन सेवा देण्याच्या बाबतीत डॉ .बिपीनचंद्र लाड यांचा नेहमीच पुढाकार असतो. खर्डा परिसरात किंवा रात्रीअपरात्री अपघात झाला व डॉक्टरांची गरज लागली तर प्रथमता आपल्या डोक्यात डॉ लाड यांचे नाव येते कारण खर्ड्यात डॉक्टर बिपिंनचंद्र लाड हे नेहमीच सामाजिक कार्य करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात .गेली २६ वर्षापासून त्यांनी आपलं छोटसं हॉस्पिटल ओपनिंग केलं हळूहळू रुग्णाची सेवा करून कुठेही अपघात वगैरे झाल्यास ते त्यांच्या स्वतःच्या गाडीने रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोच करत असतात तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कसलीही फी न घेता प्रथमोपचार करत असतात . असे त्यांचे वाखाणण्याजोगी कामे आहेत व आज त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या खर्डा व परिसरातील नागिरकांच्या सेवेकरिता सुसज्ज अशी रुग्णवाहिका आणली आहे . या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन व २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत .डॉ लाड यांच्या हातून असेच चांगले कामे घडत राहो अश्या शुभेच्छा यावेळी विजयसिंह गोलेकर यांनी दिल्या .
यावेळी उपस्थित सरपंच सौ.संजविनी पाटील , राष्ट्रवादी जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर , डॉ बिपीनचंद्र लाड , बाजार समिती संचालक वैजिनाथ पाटील,ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे , डॉ .नागरगोजे भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे , व अनेक कार्यकर्ते व पत्रकार ग्रामस्त उपस्थित होते .
चौकट
खर्डा व पंचक्रोशीतील सर्व गावांसाठी गोरगरीबांसाठी वैद्यकीय मदत मिळावी व त्यांना दर्जेदार उपचार मिळावा याकरिता डॉ . बिपीनचंद्र लाड यांनी रुग्णवाहिकेची सेवा पुर्णपणे मोफत असल्याने शहरातील गोरगरीब जनतेला याचा फायदा होणार आहे.
No comments:
Post a Comment