पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील तरुण मराठा आरक्षणाकरिता अक्षरशः मोबाईल टॉवर वर चढलाच्या प्रकार आज दुपारी ३ वाजेच्या सुमारेस घडला आहे .हा तरुण खर्डा येथील असून त्याचे नाव संतोष साबळे असे आहे . पूर्ण एक तास तरुण टॉवर वर होता , फक्त शिक्षणाकरिता तरी सरकारने आरक्षण दयावे असे त्याचे म्हणणे होते ,त्यावेळी तरुणाला पोलिसांकडून खाली उतरण्याची विनंती केली गेली तरुण टॉवर वरती असताना खर्ड्यातिला नागरिकांचा मोठा जमाव झाला होता ,त्या तरुणाला पत्रकार व पोलिसांच्या विनंतीमुळे तो तरुण खाली आला .
काही वेळातच खर्डा येथे पत्रकार परिषद घेऊन संतोष साबळे या तरुणाने या त्याच्या आक्रमक आंदोलनाबिषयी पत्रकारांशी ते बोलले की सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी हे आंदोलन आक्रोश भूमिकेत केले आहे. गावातली लोकप्रतिनिधीनि व पोलीस प्रशासनाच्या विनंतीमुळे मी खाली उतरलो आहे .त्यावेळी मला मनोज जरांगे पाटील यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की अशा मार्गाने आंदोलने करू नका शांततेच्या मार्गाने करा .मीही त्यांच्या सांगण्यावरून हे आंदोलन मागे घेतले आहे , माझी एकच सरकारला विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे व ह्या गोष्टीची दखल घ्यावी .
यावेळी खर्ड्यातील स्थानिक पुढारी व पत्रकार उपस्थित होते
No comments:
Post a Comment