पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ ऑक्टोबर
जामखेड व खर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत तसेच याच संबंधीत इतर गुन्हाच्या सुनावणीत पोलीस रिपोर्ट, तसेच मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालायचे गोमातेच्या संदर्भातील न्यायनिवाडा व वकीलांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून जामखेड न्यायालयाचे न्यायाधीश श्री. वैभव जोशी यांनी गौतस्करांना दिएकूण जनावरांच्या चारा - पाण्याचा खर्च म्हणून ३ लाख १२ हजारांचा दंड ठोठावला असून सदर दंडाची रक्कम ३ दिवसात जमा करण्याचे व जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यत प्रति गोवंश १५० रूपये अशी रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. असे न केल्यास मा. न्यायालयच्या आदेशाने पोलीस प्रशासन सदर वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई करू शकते. असा निकाल दिल्याने गौतस्करांना वचक बसून गोवंशहत्या थांबेल असा विश्वास या प्रकरणी काम करणाऱ्या गोरक्षकांना आहे. तसेच यामुळे महाराष्ट्रातील गोरक्षक व गोप्रेमीमध्ये आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
सविस्तर असे की. दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी शिवशंकर स्वामी व त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी खर्डा पोलिसाच्या मदतीने गौवंश तस्करी करणारे २ टेम्पो ताब्यात घेऊन एकूण १०४ गोवंशाचे प्राण वाचविले होते. त्यापैकी एका आयशर टेम्पो क्र. MH16. CC 1421 हा टेम्पो परत मिळावा म्हणून सदर आरोपींनी जामखेड व न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला विरोध करण्यासाठी शिवशंकर स्वामींनी पुण्याहून येऊन स्थानिक गोरक्षक पांडुराजे भोसले व गोशाळेच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच सदर आयशर टेम्पोत एकूण ९४ वासरे व गायी यांना दाटीवाटीने कोंबून दोन मजले करून वासरांचे व गायीचे तोंडे बाधलेली अवस्था व सर्व वस्तुस्थिती मांडली. मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालायचे गोमातेच्या संदर्भातील न्यायनिवाडा, खर्डा, जामखेड, आष्टी व मुंढवा अश्या विविध पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांचे FRI व संदर्भ व वकिलांनी केलेला युक्तिवाद जामखेड न्यायालयाने गोवंश तस्कारांना ठोठावला ३ लाख १२ हजारांचा दंड, तस्करांवर वचक बसून गोवंशहत्या थांबेल गोरक्षकांना विश्वास, निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या प्रकरणी मा. न्यायालयापुढे राधाई गोशाळेच्या वतीने ॲड. गोलेकर, ॲड. के. काञजकर, जी .एम. राळेभात, व्हि.एम. वारे, घनश्याम राळेभात व वैष्णवी गोलेकर यांनी बाजू मांडत युक्तिवाद केला.
तसेच न्यायालयीन कामकाजात गोरक्षक शिवशंकर स्वामी, पांडुरंग भोसले, योगेश सुरवसे, रोहित गोलेकर, बबलू निकम, गणेश ढगे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड , खर्डा तसेच राधाई गोशाळा यांचे निकाल लागेपर्यंत पाठपुरावा केला. पुणे ॲड. प्रशांत यादव, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. राजू गुप्ता मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment