कर्जत व जामखेड तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजुर करून महायुती सरकारने दिली दिवाळीची अनोखी भेट - आ. प्रा.राम शिंदे - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

Home राजकीय बातम्या कर्जत व जामखेड तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजुर करून महायुती सरकारने दिली दिवाळीची अनोखी भेट - आ. प्रा.राम शिंदे

कर्जत व जामखेड तालुक्यासाठी ५ कोटींचा निधी मंजुर करून महायुती सरकारने दिली दिवाळीची अनोखी भेट - आ. प्रा.राम शिंदे

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१० नोव्हेंबर

 कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागावीत यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकार दरबारी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला आणखीन एक मोठे यश मिळाले आहे. ऐन दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेडकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरवणे या योजनेतून सुमारे पाच कोटींचा भरघोस निधी मंजुर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात विकास कामांचा नवा झंझावात निर्माण झाल्याने जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांमधील स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे ग्रामीण भागात मुलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी केली होती. आमदार प्रा.राम शिंदे यांनी या मागण्यांची तातडीने दखल घेत नगरविकास व पंचायतराज विभागाकडे या कामांसाठी पाठपुरावा हाती घेतला होता. सरकारने आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत कर्जत-जामखेड मतदारसंघातील 51 कामांना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे 5 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. ही कामे 2023-2024 या आर्थिक वर्षांतील तरतुदींनुसार ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे (लेखाशिर्ष  2515  1238 ) या योजनेतून मंजुर करण्यात आली आहेत. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. 

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लावण्याचा धडाका हाती घेतला आहे. आजवर त्यांनी करोडो रूपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. आमदार प्रा राम शिंदे हे मंत्री असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात विकासाचा जो झंझावात निर्माण झाला होता तोच झंझावात आता महायुती सरकारच्या काळात सुरु झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळत असल्याने मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजुर होत आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

*जामखेड तालुक्यातील मंजुर कामे व निधी  खालीलप्रमाणे*

1) घोडेगाव येथे सभामंडप बांधणे -  10 लाख रूपये 
2) हळगाव येथील तुकाईवस्ती येथे बाळू मामा मंदिर सभामंडप बांधणे  - 7 लाख रूपये 
3) मतेवाडी येथे मतेगल्ली ते कल्याण रांगडे घरे सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करणे - 8 लाख रूपये 
4) कवडगाव येथे नवीन स्मशानभूमी बांधणे - 10 लाख रूपये 
5) महारूळी येथे सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
6) बाळगव्हाण येथील तुळजाभवानी मंदिर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
7) दिघोळ येथे संत नरहरी सोनार महाराज मंदिर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
8) पाडळी येथील जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत उभारणे - 10 लाख रूपये 
9) फक्राबाद येथे कब्रस्थान वाॅल कंपाऊड बांधणे व सुशोभीकरण करणे - 10 लाख रूपये 
10) पाटोदा बसस्थानक परिसरात पेविंग ब्लाॅक बसवणे - 10 लाख रूपये 
11) बुऱ्हाणपुर येथील मारूती मंदिर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
12) मुंगेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा इमारत बांधणे - 10 लाख रूपये 

*कर्जत तालुक्यातील मंजुर कामे व निधी खालील प्रमाणे*

1) कोपर्डी येथे हरणवाडी मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे -  10 लाख रूपये 
2) तिखी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
3) चलाखेवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
4) खुरंगेवाडी येथे हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे -  10 लाख रूपये 
5) राक्षसवाडी खुर्द येथे अहिल्यादेवी यांच्या स्मारकास सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये.
6) पिंपळवाडी येथील माळवदे वस्ती जिल्हा परिषद शाळेत पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये.
7) देऊळवाडी येथे शिवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये.
8) दिघी येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
9) लोणी मसदपुर येथे फिरंगाईदेवी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
10) मानेवाडी येथे ज्योतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे -  10 लाख रूपये 
11) शिंतोडा येथे भैरवनाथ मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये 
12) हंडाळवाडी येथे गावठाण रस्ता काँक्रिटीकरण करणे - 10 लाख रूपये. 
13) अंबी जळगाव येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
14) डोंबाळवाडी येथे तुळजाभवानी मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
15) औटेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेजवळील रस्ता काँक्रिटीकरण करणे - 10 लाख रूपये 
16) नागापूर येथे बुवासाहेब महाराज मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
17) बाभुळगाव खालसा येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
18) नेटकेवाडी येथे तुळजाभवानी मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
19) बाभुळगाव दुमाला येथे मरिमाता मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये.
20) कोळवडी येथे नविन अंगणवाडी बांधकाम करणे - 10 लाख रूपये. 
21) थेरवडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
22) वालवड येथे महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
23) गोयकरवाडी येथे ज्योतिर्लिंग मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
24) गुरवपिंप्री येथे महादेव मंदिर आवारात भजनी साहित्य ठेवण्यासाठी खोली बांधणे - 10 लाख रूपये. 
25) कोरेगाव येथे सटवाई मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये.
26) बहिरोबावाडी येथे यल्लमादेवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे - 5 लाख रूपये. 
27) थेटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
28) खांडवी येथे तुकाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
29) नागलवाडी येथे नागेश्वर मंदिर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
30) सितपुर येथे स्मशानभूमी परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
31) घुमरी येथे काळूबाई मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
32) कोळवडी येथे विठ्ठल- रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
33) मिरजगाव येथे भारत विद्यालय परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे - 10 लाख रूपये. 
34) नवसरवाडी येथे यल्लामादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
35) बारडगाव दगडी येथे सांस्कृतिक सभागृह बांधणे - 10 लाख रूपये. 
36) पाटेवाडी येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
37) रवळगाव येथे खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे - 10 लाख रूपये. 
38) सुपे येथे मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10 लाख रूपये. 
39) आनंदवाडी येथे गावठाणमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे - 10 लाख रूपये.

चौकट

कर्जत-जामखेड मतदारसंघात गावअंतर्गत मुलभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी जनतेतून मागणी होत होती. या मागणीनुसार सरकारकडे विविध कामांचे प्रस्ताव दाखल केले होते. नगरविकास व पंचायतराज विभागाने लेखाशिर्ष 2515 1238 अंतर्गत मतदारसंघातील 51 गावांमधील कामांना मंजुरी देत सुमारे 5 कोटींचा निधी मंजुर केला आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. कर्जत व जामखेड तालुक्यांसाठी एकुण 5 कोटींचा निधी मंजुर करून महायुती सरकारने जनतेला दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. कर्जत व जामखेड तालुक्यासाठी भरीव निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार! 
   - आमदार प्रा.राम शिंदे
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *