पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२ जून
दिघोळ तालुका जामखेड येथील पोस्टमास्तर श्रीराम शिंदे हे पंचेचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर तर खर्डा येथील डाक सेवक उत्तरेश्वर मिसाळ हे बेचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ मे २०२४ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्त निमीत्त सत्कार समारंभ रत्नसुरेश कॉम्प्लेक्स, शिर्डी-हैदराबाद मार्ग, खर्डा या ठिकाणी नुकताच पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत उपविभागाचे प्रमुख अमित देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे, खर्डा विविध कार्यकारी सोसायटीचे राजेंद्र गोलेकर तसेच प्रा.श्याम गोलेकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
खर्डा येथील पोस्टमास्तर निलेश गोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी डाक आवेक्षक बाबुराव पंडित, भरत दाताळ, दिपाली शिंदे, दीपक शिरसाठ, खर्डा येथील मान्यवर तसेच शिंदे व मिसाळ यांचे नातेवाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बोबडे तर आभार प्रदर्शन एकनाथ गायकवाड यांनी केले.
No comments:
Post a Comment