पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१जून
जामखेड तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ असलेल्या चोंडी येथे दि.३१ मे रोजी राज्यसरकारच्या वतीने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्री व आजी माजी आमदार यांच्या उपस्थितीत अभिवादन सभा पार पडली. या सभेसाठी मोठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली होती. मात्र इतके असतानाही या अभिवादन सभेस रा.आटपाडी ता.आटपाडी जि.सांगली येथून आलेले आहिल्या भक्त यशवंत हरिदास मेटकरी (वय36) यांची दीड तोळा वजनाची गळ्यातील सोन्याची चैन (अंदाचे ६००००रु किंमतीची)
कोणीतरी आज्ञात चोराने चोरून नेली. इतका मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही चोराने चोरी केल्याने या घटनेचा तपास करण्याचे मोठे आव्हान जामखेड पोलीसांसमोर आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व जयंतीच्या शासकीय कार्यक्रमात हा प्रकार झाल्याने या घटनेमुळे जामखेड पोलीसांची नाचक्की झाली असून पोलीस निरीक्षक महेश पाटील या घटनेकडे कसे पाहतात यावर चोरीच्या घटनेचा तपास अवलंबून आहे.
सदर घटनेबाबत काल दि.३१ मे २०२४ रोजी जामखेड पोलीस स्टेशन गु.र.क्र व कलम २८९/२०२४ भा.द. वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील च्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल लोखंडे करत आहेत.
No comments:
Post a Comment