कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा - आमदार प्रा.राम शिंदे यांची सरकारकडे मागणी - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, ८ जून, २०२४

Home राजकीय बातम्या कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा - आमदार प्रा.राम शिंदे यांची सरकारकडे मागणी

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा - आमदार प्रा.राम शिंदे यांची सरकारकडे मागणी

शनिवार, जून ०८, २०२४ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/८ जून

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री  देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्यानंतर जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. आमदार शिंदे यांनी केलेल्या महत्वपूर्ण मागणीमुळे जामखेड तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात सिंचनाची मोठी सोय नाही. तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तलुक्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. तालुक्यात पाट पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी व जामखेड तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे पुढाकार घेतला आहे. आमदार शिंदे यांनी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. 

आमदार प्रा राम शिंदे यांनी १९/०५/२०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी केली आहे. या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासून अहवाल सादर करावा असे निर्देश देताच जलसंपदा विभागाने ६ जून २०२४ रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना एक पत्र लिहले आहे. महामंडळाने आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा असे या पत्रात म्हटले आहे.
कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश होण्यासंदर्भात आता शासकीय पातळीवर हालचाली वाढल्यामुळे जामखेड तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

कोल्हापूर सांगली भागात दरवर्षी कृष्णा व इतर नद्यांना मोठा पुर येतो. पुराचे वाहून जाणारे पाणी वाया जाते. याच पाण्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना सरकारने आखली आहे. या योजनेतून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी दिले जाणार आहे. यातील पहिला प्रकल्प बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात राबवला जाणार आहे. यासाठी सरकारने कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरचे काम वेगाने सुरु आहे. आष्टी मतदारसंघात जाणारे पाणी कर्जत व जामखेड तालुक्यातून जाणार आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याचा समावेश कृष्णा खोऱ्यात होतो. जामखेड तालुका हक्काच्या पाण्यापासून वंचित आहे. जामखेड तालुक्यावर झालेला अन्याय दुर व्हावा यकरिता कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा अशी मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी महायुती सरकारकडे केली आहे. 

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला जामखेड तालुक्याचा कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत समावेश व्हावा याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जामखेड तालुक्यातील जनतेचे गेल्या अनेक वर्षांची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांची ही मागणी यशस्वी झाल्यास दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी दुष्काळ मिटणार आहे.


चौकट

दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कृष्णा भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने हाती घेतली आहे. या योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे मराठवाड्याला दिले जाणार आहे. सदर योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून अहवाल मागवला आहे. जामखेड तालुक्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षांची मागणी महायुती सरकार कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमांतून पुर्ण करेल आणि जामखेड तालुक्याला हक्काचे पाणी मिळेल हा मला ठाम विश्वास आहे. 

 - आमदार प्रा.राम शिंदे
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शनिवार, जून ०८, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

आ. राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, चौंडीतील धनगर आंदोलन स्थगित

श्री शिवप्रतिष्ठान व खर्डा ग्रामस्थांच्या मागणीला यश ; किल्ल्याच्या सौंदर्यास बाधा ठरणारे जनसुविधा केंद्राचे होत असलेले काम थांबवुन इतरत्र ठिकणी सुरू होणार

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

आ. राम शिंदे खर्ड्याच्या किल्ल्यावर समोरासमोर चर्चेला या मी पाठपुरावा केलेली कागदपत्रे घेऊन येतो. "होऊन जाऊ द्या दुध का दुध और पाणी का पाणी" - आ.रोहित पवार

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *