पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१ऑगस्ट
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जिवाचं रान करून समाजात बंधुता नांदावी, तसेच समाज एकसंघ असावा.यासाठी लेखणीतून प्रयत्न केले.आपण जे जीवन जगत आहोत.या महान व्यक्तींच्या विचारांमुळे आहोत.आजच्या युवा पिढीने अण्णाभाऊंच्या कार्याचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजात काम केले पाहिजे.तसेच समाजाची सेवा करावी. असे मत यावेळी जयंती प्रसंगी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
आज दि १ऑगस्ट रोजी जामखेड शहरातील साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ प्रदीप कात्रजकर, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, बाजार समितीचे माजी संचालक सागर सदाफुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील व डॉ प्रदीप कात्रजकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ.प्रदीप कात्रजकर, सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले, बाजार समितीचे माजी संचालक सागर काका सदाफुले,राजेंद्र सदाफुले,दादासाहेब घायतडक, अँड.कृष्णा शिरोळे,लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष लखन मिसाळ, किशोर कांबळे,रवि डाडर,शरद मोरे, नितीन डाडर,आरपीआयचे ता.अध्यक्ष प्रमोद सदाफुले,शहर अध्यक्ष रवि सोनवणे,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, शेखर मोरे, जितेश डाडर,सुरज डाडर सर,महेश यादव ,लखन गाडे, सनी प्रिन्स सदाफुले,विकी गायकवाड,विनोद काबंळे,लखन मोरे,विकी काबंळे,अमोल गव्हाळे,राम गाडे आदी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आभार शरद मोरे यांनी मानले.
No comments:
Post a Comment