या तक्रारींमुळे आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत, “नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, सर्वसामान्यांच्या समस्या सहानुभूतीने तातडीने सोडवा,” अशा स्पष्ट सूचना दिल्या. आमसभेत पवार यांनी सलग आठ तास नागरिकांच्या अडचणी ऐकून काही समस्यांचे निपटारे लगेच केले; काही प्रकरणे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच मार्गी लावली.
आमसभा सुरु होण्याआधीच पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची गावागावांत पाहणी केली. त्यांनी तेथील शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून पंचनामे तातडीने करण्याचे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश दिले.नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारावरही आमदारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कचरा व्यवस्थापन, चिखलमय रस्ते, मोकाट जनावरे, तुंबलेली गटारी, डासांचा उपद्रव, अनियमित पाणीपुरवठा या बाबींवर नागरिकांनी आक्रमकपणे आवाज उठवला. “‘हा पैसा जनतेचा आहे, हे लक्षात ठेवा,’’ असे बजावत अधिकाऱ्यांना अकार्यक्षमतेबद्दल ठणकावून सांगितले.पंचायत समितीच्या योजनांसंबंधी व लसीकरणासंबंधीही अनेक तक्रारी नोंदल्या गेल्या. लंपी प्रादुर्भाव वाढत असतानाही लसीकरण नाही, रोजगार हमीच्या कामांची खोळंबा अशा मुद्द्यांवर आमदारांनी प्रशासनाला जाब विचारला. “कारभारात सुधारणा करावी, अन्यथा लोक माझीही ऐकणार नाहीत; पुढील घटनांसाठी जबाबदार अधिकारी असतील” असा इशारा पवार यांनी दिला.
कोट
आमदारांच्या कार्यक्षमतेने अधिकाऱ्यांची तारांबळ
राजकारणात काम करण्याबाबत ‘पवार’ नावाशी कुणीही बरोबरी करू नये, असे नेहमी बोलले जाते. मग त्यामध्ये शरद पवार असो, अजित पवार असो किंवा रोहित पवार असो. त्याचीच प्रचिती कर्जत आणि जामखेड या दोन्हीही ठिकाणी आली. दोन्ही दिवस झालेल्या आमसभेत आमदार रोहित पवार यांनी सलग ८ तास एका जागी बसून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि जागीच त्याची सोडवणूक केली. परंतु हे करत असताना एक मिनीटही खुर्चीवरून न उठता सलग ८ तास एका जागी बसून काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेची अधिकाऱ्यांमध्येही चर्चा सुरु होती. स्वतः आमदार एका जागी बसून लोकांचे प्रश्न मार्गी लावत असल्याने अधिकाऱ्यांनाही पळवाट काढता येत नव्हती. त्यामुळे दोन्ही दिवस हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लागले. याबाबत नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे कौतुक केले आणि त्यांचे आभारही मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा