जामखेड प्रतिनधी/१५ सप्टेंबर२०२५
जामखेडमध्ये प्रतिष्ठीत व्यावसायिकाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमन नाझीमोद्दीन काझी (वय २३) असे मयत तरुणाचे नाव असून तो स्थानिक व्यावसायिक नाजीम काझी यांचा मुलगा आहे.
दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी नुराणी कॉलनी परिसरात घोडके हॉस्पिटलच्या पाठीमागील बंगल्यात ही घटना उघडकीस आली. अमनने प्रथम हाताची नस कापून घेतली, त्यानंतर दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मृतदेह आढळला तेव्हा त्याच्या कानात हेडफोन होते, अशी माहिती मिळाली आहे.
अमन हा नेहमी रात्री नुराणी कॉलनी येथील बंगल्यात झोपण्यासाठी येत असे. मात्र सकाळी तो खर्डा रोडवरील घरी परतला नाही म्हणून त्याच्या आईने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन न उचलल्याने वडिलांनी बंगल्यात जाऊन पाहिले असता ही घटना उघड झाली.
याबाबतची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अमनचा मोबाईल जप्त असून त्यातील तपशील तपासला जाणार आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रविण इंगळे करीत आहेत.
कोट :
"अशाप्रकारच्या घटना तरुणांनी करून नयेत. एका क्षणिक भावनेमध्ये आई-वडिलांचे संपूर्ण जीवन उध्वस्त होऊ नये."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा