आमदार प्रा राम शिंदेंनी भरला बुथ प्रमुखांसह पन्ना प्रमुखांमध्ये जोश, जामखेड तालुक्यातील बुथप्रमुख मेळाव्यांना तुफान प्रतिसाद ! - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४

Home राजकीय बातम्या आमदार प्रा राम शिंदेंनी भरला बुथ प्रमुखांसह पन्ना प्रमुखांमध्ये जोश, जामखेड तालुक्यातील बुथप्रमुख मेळाव्यांना तुफान प्रतिसाद !

आमदार प्रा राम शिंदेंनी भरला बुथ प्रमुखांसह पन्ना प्रमुखांमध्ये जोश, जामखेड तालुक्यातील बुथप्रमुख मेळाव्यांना तुफान प्रतिसाद !

मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२२ऑक्टोबर

कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार प्रा.राम शिंदे यांना भाजपने रविवारी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच आमदार प्रा.राम शिंदे यांनी सोमवारी खर्डा, जवळा जिल्हा परिषद गट व जामखेड शहरातील पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत जोश भरला. भर पावसात पार पडलेल्या या बैठकांना तुफान प्रतिसाद मिळाला.निवडणूकीला कसे सामोरे जायचे, काय रणनिती असणार यावर सखोल मंथन झाले. भूमिपुत्रांच्या हक्काची आणि स्वाभिमानाची लढाई ताकदीने लढायची आणि विक्रमी मताधिक्याने निवडणूक जिंकायची, असा निर्धार यावेळी करण्यात आला. 

रविवार आमदार प्रा राम शिंदे यांना भाजपने कर्जत-जामखेड मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. सलग चौथ्यांदा आमदार शिंदे यांना भाजपने विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत राजेवाडी, लोणी फाटा आणि जामखेड शहर या ठिकाणी बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे मेळावे पार पडले. आमदार शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल महायुती व भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आले.भर पावसात या मेळाव्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून बुथप्रमुखांसह पन्ना प्रमुखांमध्ये आमदार शिंदे यांनी चांगलाच जोश भरला गेला. मोठ्या उत्साहात या बैठका पार पडल्या. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी बोलताना कर्जत-जामखेड प्रभारी - भरतभाई गोंदालिया म्हणाले की,आमदार प्रा राम शिंदे यांनी सेवादार म्हणून मतदारसंघात काम केले. जनतेचा सेवेकरी म्हणून काम केले. त्यामुळे पक्षाने त्यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी बहाल केली. कर्जत-जामखेडमध्ये होणारी निवडणूक सामान्य नाही, मागील पाच वर्षात मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.परंतू यंदा विरोधकाला असे हरवा की, यापुढेही कोणत्याही बाहेरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवण्याची तलफ झाली नाही पाहिजे. त्यासाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा, जोश आणि बुध्दीने ही निवडणूक लढवा, कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या मातीतल्या भूमिपुत्राला जिंकून आणण्यासाठी जोमाने कामाला लागा, असे अवाहन त्यांनी केले. 

यावेळी आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत माझ्या पराभवानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष उभा केला. प्रत्येक कार्यकर्ता ना कार्यकर्ता झुंजला, कार्यकर्त्यांना प्रचंड अडचणी आल्या, संकट आले पण तो हटला नाही, त्याने निकराची झुंज दिली. जनतेची सेवा केली. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, सहकारी संस्थांच्या निवडणूकीत घवघवीत यश मिळवले आणि पक्षाचे मजबुत संघटन उभा करण्याचे काम केले, त्याला प्रतिसाद देत पक्षाने मला पुन्हा एकदा तिकीट दिलं, त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार.

प्रत्येक बुथप्रमुख हा स्वता:च विधानसभेचा उमेदवार आहे असे समजून त्याने काम करावे, जमिनीवर राहून आपल्याला ही लढाई लढायची आहे. हवेत राहून काम केल्यास आपल्या सर्वांचाच कार्यक्रम होईल.आपले बुथ मजबुत ठेवण्यासाठी अहोरात्र काम करा.पुढील 30 दिवस पक्षासाठी द्या, पुढचे पाच वर्षे पक्ष तुमची योग्य दखल घेईल. विरोधकांनी मागच्या पाच वर्षांत नुसत्या भूलथापा दिल्या. आताही ते गंडवा गंडवी करतील. त्यामुळे सर्वांनी सतर्क रहावे, विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराचा भांडाफोड करावा, आपल्या माध्यमांतून आजवर झालेली विकास कामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहचवा, सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करा, विरोधकांच्या जाळ्यात न अडकता आपले काम करत रहा,असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी केले. 

दरम्यान, आज आणि उद्या कर्जत तालुक्यात माहिजळगाव, मिरजगाव, कर्जत शहर, कुळधरण, राशिन या पाच ठिकाणी बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे मेळावे पार पडणार आहेत. या सर्व मेळाव्यांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन, महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at मंगळवार, ऑक्टोबर २२, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

खर्डा जि.प.प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाची धामधुम,वार्षिक स्नेह संमेलनातून कलागुणांना मिळाली प्रगतीची वाटचाल

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

खा. सुजय विखे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध, दिव्यांग बांधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत स्कूल व्हॅन सेवेचा शुभारंभ संपन्न

खर्डा शहरात धार्मिक पर्यटनाला चालना; आमदार रोहित पवार यांच्याकडून लक्ष्मी आई मंदिराच्या सभामंडपाकरिता १ लाखाची मदत, सभामंडपाचे काम सुरू

आ. रोहित पवार यांच्याकडून स्वखर्चातून मोहरी तलावाच्या दुरुस्तीची तयारी, कुकडी व सीना कालवा आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी,जलसपंदा विभागाने दिले कार्यवाहीचे आदेश

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *