पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२२ऑक्टोबर
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड राहता आणि लोणी या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारूच्या धंद्यावर गुन्हे शाखेने धाड टाकली आहे . एकूण ६५ , ०४० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे .
आगामी लोकसभा निवडणुकीचे २ अनुषंगाने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला , यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहे, तरी देखील अवैध धंदे आमानुषपणे चोरी छूपे चालू होते . तर गुन्हे शाखेने अवैध धंदे सुरु असणाऱ्या ठीक ठिकाणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बबन मखरे, अतुल लोटके, आकाश काळे ,भाऊसाहेब काळे , विशाल तनपुरे, प्रमोद जाधव, तसेच बापूसाहेब फुलाने, रणजीत जाधव व रोहित मिसाळ तपास पथक अहिल्यानगर अशांचे दोन पथक तयार करून दिनांक २१/१०/२०२४ रोजी जामखेड, राहाता व लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना दारू विक्री करणारे हॉटेलवर छापे टाकुण कारवाई केली आहे. कारवाईमध्ये एकुण १४ गुन्हे दाखल करुन १४ आरोपींचे ताब्यातुन ६५,०४०/- रुपये किंमतीची देशी विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे .
अ.नं. पोलीस ठाणे दाखल केसेसची संख्या जप्त मुद्देमाल किंमत आरोपी संख्या
1 जामखेड 8 47,080 8
2 राहाता 4 12,000 4
3 लोणी 2 5,960 2
एकुण 14 गुन्हे दाखल 65,040
14
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , अपर , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे , उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, कर्जत उपविभाग पोलीस अधिकारी शिरीष वमने , शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment