नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या नेवासा तालुक्याची बैठक पार पडली. प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक डी.टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बाळासाहेब बोधक यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमतें निवड करण्यात आली.
बाळासाहेब बोधक यांनी दैनिक लोक परिवर्तन,जनता आवाज, दवंडी न्यूज, बी. जे. स्टार न्यूज इत्यादी वर्तमानपत्रातून विविध विषयावर लिखाण करून तळागाळातील घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलें याच कार्याची दखल घेऊन संघटनेने तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन गौरव केला. जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिरसाठ नवनिर्वाचित अध्यक्ष युनुस पठाण, उपाध्यक्ष आदेश जावळे,कार्याध्यक्ष सुरेश घुगासे, प्रसिद्धीप्रमुख दत्तात्रय शिंदे, सचिव पदी विकास बोर्डे संघटक पदी सुमित पटारे, सचिन कुरुंद सचिव संदीप वारकड, प्रवीण खरात,गणेश झगडे,अशोक सांगळे, राजेंद्र कसबे, मयूर मंडलिक, तसेच ज्येष्ठ पत्रकार शहराम आगळे, रवींद्र लिंबोरे, रंजन दादा जाधव, सुधीर जावळे यांच्यासह अदि,पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment