नेवासा प्रतिनिधी:१८ जानेवारी२०२५
नेवासा पोलिसांच्या गेल्या काही दिवसांपासून कामगिरी बद्दल नागरिक असमाधानी असल्याचे दिसून येत आहे पोलीस दप्तरी रखडलेल्या गुन्ह्यांचा तात्काळ तपास लावून नागरिकांच्या मनात खाकी वर्दीवरचा विश्वास निर्माण व्हावा तसेच राञीच्यावेळी शहरासह परिसरातील गस्तीमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांंमधून केली जात आहे माञ पोलीसांकडून नांव चोऱ्यांचे अन् कारवाईच्या नावाखाली मटका,गुटखा, जुगार अड्ड्यांवरच पोलीस पथकाचा दिवस कसा निघून जातो? हेच समजून येत नसल्यामुळे डीबी (डिटेक्टिव्ह ब्रँच) पथक केवळ नावालाच असल्याचे समोर येत आहे चोरी - घरफोड्या लुटीच्या या घटनांमध्ये वाढ झालेली असतांना एकाही चोरीचा तपास पोलीसांना लावण्यात या पथकांना यश आलेले नाही त्यामुळे आता आंदोलनातून पोलीसांचे लक्तरे वेशीला टांगले जाण्याची अधिक शक्यता नाकारता येत नाही? त्यामुळे पोलीसांना घडलेल्या गुन्ह्याची उकल करुन चोरटे जेरबंद करण्याची मोठी जबाबदारी आलेली असून अन्यथा नेवासकर आता मोठ्या आंदोलनाच्या पाविञ्यात असून खाकीवर्दीची अधिक बेईज्जत होण्याचा धोका नाकारता येत नाही त्यादृष्टीने पोलीसांनी तपासाची सुञे आता हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे
नगर गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून नेवाशात सलग दोन दिवस कत्तलसाठी आणलेली जीवंत गोमांस जनावरे पकडून त्यांना जीवदान दिलेले होते तसेच मावा - गुटख्यावर गुन्हे शाखेने धाडसञ राबवत कारवाई केलेली असतांना नेवासा पोलीस 'मुग गिळून' गप्प का? असा संतप्त सवाल नेवासकरांतून उपस्थित होत असतांना नुकतेच सौंदाळा (ता.नेवासा) येथील मंदिरातील मुर्तीच्या झालेल्या चोरीचा तपास न लागताच पुन्हा तीन ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी होवून तीन लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन पोबारा केला त्यामुळे पोलीसांच्या भुमिकेबाबत जनतेतून आश्चर्याबरोबरच चिडही व्यक्त केली जात आहे.
नेवासा शहरासह परिसरात झालेल्या चोऱ्यांच्या तपासाचा छडा पोलीसांना न लागताच सततच दुसऱ्या घटना पुन्हा घडत असल्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर नेवासकरांकडून नाराजी निर्माण झालेली आहे त्यामुळे पोलीसांच्या विरोधात नेवासकर एकवटलेले असून आता २६ जानेवारी रोजी नेवासा पोलीस ठाण्यासमोर नेवासकरांकडून आंदोलन करण्यात येणार आहे पोलीस यापुर्वी झालेल्या चोऱ्यांचा छडा न लावता होणाऱ्या चोऱ्याही रोखू शकत नसल्यामुळे पोलीसांची भूमिका सध्या केवळ बोलघेवडी ठरतांना दिसून येवू लागली असून दरमहा अवैद्ध धंदे चालकांकडून हातमिळवणी करुन आला दिवस पुढे ढकलून कारभार सुरु असल्यामुळे पोलीसांच्या कारभाराबाबत जनतेतून संतापाची लाट उसळली आहे.
No comments:
Post a Comment