पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७ जानेवारी२०२५
जामखेड शहरातील मोठ्या प्रमाणात गोवंशाची चालणारी कत्तल , बेकायदेशीर कत्तलखाने व बाहेरच्या जिल्ह्यात कत्तलीसाठी होणारी वाहतूक तसेच दर शनिवारी शहरात भरत असलेल्या जनावरांच्या बाजारात कशा पद्धतीने शेतकरी बांधवांचे शोषण करुन फसवणूक केली जाते. आणि जनावरे कत्तलीसाठी विकत घेऊन पाठविले जातात याबाबत सर्व सविस्तर माहिती विधानसभापरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांना जामखेड तालुक्यातील गोरक्षकांनी दिली. व सर्व बेकायदेशीर प्रकार थांबवावेत आणि गोमाफियांवर व त्यांच्या एजंट लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी गोरक्षकांकडून राम शिंदे यांना करण्यात आली. त्यावेळी प्रा. राम शिंदे यांनी गोरक्षकांना आश्वासन दिले की आपण सगळं बंद करुन गॊवंश हत्त्या बंदी कायद्याची कडक अंबलबजावणी करू असे अश्वासन सभापती राम शिंदे यांनी गोरक्षकांना दिले आहे.यावेळी गोरक्षकांकडून सभापती प्रा.राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष गोरक्षक पांडुराजे भोसले , कृष्णा सातपुते , सरपंच लहू शिंदे , अक्षय घागरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment