पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७ जानेवारी२०२५
जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस दलाने विविध कार्यक्रम व उपक्रमाव्दारे जनजागृती व उपाययोजना हाती घेतल्या असून त्यानुसार आज दि. १६ जानेवारी रोजी दुपारी ४ : ०० ते ४:४५ वाजताचे सुमारास रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्त जामखेड पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेच्या माध्यमातून शहरातील ल. ना. होसिंग विद्यालय ते खर्डा चौक अशी शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली होती.
ही रॅली खर्डा चौक येथे आली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे व सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगितले त्यांनंतर त्यांना सांकेतिक चिन्ह व प्रात्यक्षिक दाखवले.
या रस्ता सुरक्षा कार्यक्रमासाठी ल. ना. होसिंग विद्यालयचे १०० विद्यार्थी, शिक्षक वृंद, देढे सर, कैलास वराट व जामखेड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस नाईक अविनाश ढेरे, कॉन्स्टेबल दिनेश गंगे व सचिन चव्हाण, दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment