मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध गंभीर अडचणी सोडवण्यासाठी आ. रोहित पवारांनी घेतली कृषी मंत्र्यांची भेट ,भेटीनंतर तात्काळ कृषी मंत्र्यांनी संबंधितांना दिले आदेश - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

Home कर्जत-जामखेड ठळक बातम्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध गंभीर अडचणी सोडवण्यासाठी आ. रोहित पवारांनी घेतली कृषी मंत्र्यांची भेट ,भेटीनंतर तात्काळ कृषी मंत्र्यांनी संबंधितांना दिले आदेश

मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध गंभीर अडचणी सोडवण्यासाठी आ. रोहित पवारांनी घेतली कृषी मंत्र्यांची भेट ,भेटीनंतर तात्काळ कृषी मंत्र्यांनी संबंधितांना दिले आदेश

सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२ कर्जत-जामखेड, ठळक बातम्या,

कर्जत/जामखेड:५ सप्टेंबर
 कर्जत जामखेड मतदारसंघातील विविध अडचणी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत. अशातच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध कारणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळावी, यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मुंबईत भेट घेतली आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान तुरळक पाऊस झाला असून ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दांडी मारली आहे. 
कर्जत व जामखेड हे दोन्ही तालुके अवर्षण प्रवण असून येथील शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तूर, उडीद, बाजरी या दोन्ही तालुक्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच कर्जत जामखेड तालुक्यातील तुर पिकांवर वांझ रोग आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.  कर्जत तालुक्यात एकूण 11000 हेक्टर तुरीचा उत्पादन घेतलं जात असून जामखेड तालुक्यात एकूण 10000 हेक्‍टरवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. तुरीवर वांज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. हा रोग आटोक्यात न आल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते या अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावे व पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई तात्काळ द्यावी व पिक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारी खर्चातून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे. 
महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील तात्काळ आमदार रोहित पवार यांच्या विनंतीवरून कृषी आयुक्तांना तूर पिकांवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तात्काळ प्रयत्न करत कृषी सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आ. रोहित दादांच्या यशस्वी प्रयत्नातून आता कर्जत-जामखेड तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळून बळीराजा सुखावला जाणार आहे. 

*प्रतिक्रिया*- 

तुरीवर वांझ रोगामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर व देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर सरकारने लक्ष द्यावं. तसेच नुकसान झाल्यास पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून व पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारी खर्चातून मदत द्यावी, यासोबतच  ज्या भागात समाधानकारक पाऊस पडला नाही अशा भागातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देऊन पोखरा योजनेअंतर्गत विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाग सुद्धा घेण्यात यावा याबद्दलची विनंती कृषी मंत्री महोदयांना भेटून केली. 

- आमदार रोहित पवार
(कर्जत जामखेड विधानसभा)
Tags # कर्जत-जामखेड # ठळक बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

ठळक बातम्या
Posted at सोमवार, सप्टेंबर ०५, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels कर्जत-जामखेड, ठळक बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

प्रशासनाची कठोर कारवाई: जिवंत व्यक्तीला मृत दाखवणारा ग्रामसेवक सेवेतून निलंबित

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *