खर्डा प्रतिनिधी : ५ आॅक्टोबर
ऐतिहासिक खर्डा शहरातील दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा येथे मल्लिकार्जुन मंदिरात व श्री संत सिताराम बाबा गडावर भाविकांची मोठा उत्साह दिसून आला. दुसऱ्याचे सिमोल्लंघन करत भाविकांनी मनोभावे अनेक संकल्प सोडले. एकुणच भक्तीमय वातावरणात आजचा दसरा साजरा झाला.
या बरोबरच ऐतिहासिक खर्डा शहर परिसरातील १२ ज्योतिर्लिंगाने दर्शन घेण्यासाठी भावीक जात होते. खर्डा हे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठे आणि ऐतिहासिक शहर मानले जाते, शहरात मोठ मोठी मंदिरे आहेत व या मंदिरात आज दसऱ्याच्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. तसेच आज दसरा असल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण झालेले दिसले.
दरम्यान नवरात्र उत्सवानिमित्त खर्डा शहरात आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन, पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव प्रा.सचिन गायवळ यांच्या वतीने आयोजित तुमच्यासाठी काय पण हा बहारदार लावण्यांचा भरगच्च, बुरहानगर येथून तुळजापूर कडे प्रस्तान करत असताना खर्डा येथे थांबल्या नंतर होणारा पंलग उत्सव तसेच खर्डा शहरात स्थापन झालेली देवीचे ९ मंडळे यांच्य वतीने दहा दिवस घेतलेले कार्यक्रम व आज दि. ६ रोजी दसऱ्याच्या निमित्ताने खर्डा शहरात सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती.
एकंदरच हे सर्व कार्यक्रम व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी ऐतिहासिक खर्डा शहराला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते. यावर्षीचे सर्वच कार्यक्रम अविस्मरणीय ठरले असल्याच्या भावना खर्डेकर व्यक्त करत आहेत..
No comments:
Post a Comment