जामखेड प्रतिनिधी : ३० आॅक्टोबर
जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील जनपिर बाबा दर्ग्याजवळील मैदानात भवरवाडी ता. जामखेड येथे दि. २९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७:०० वाजताचे सुमारास या घटनेतील फीर्यादी रेखा लक्ष्मण काळे (वय ४५ वर्ष) व ईतर साक्षीदार हे ऊस तोडणी कामाकरिता जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील जामपीर बाबा दर्ग्याजवळील सार्वजनिक मैदान या ठिकाणी असताना या घटनेतील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे, विश्वनाथ मोरे (पूर्ण नाव माहित नाही), बारीकराव विश्वनाथ मोरे, 4) गोंदाबाई विश्वनाथ मोरे सर्व राहणार भवरवाडी तालुका जामखेड 5), तुषार हनुमंत पवार रा. जामवाडी ता. जामखेड व इतर अनोळखी 5 इसम (नाव गाव माहित नाही,) अशा दहा आरोपी जमावाने तेथे आले व साक्षीदार लक्ष्मण काळे यांना आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने तू माझा मोबाईल चोरून आणला आहे तो मला दे असे म्हणून खिशातील पिस्तूल काढून फिर्यादी व साक्षीदार यांचे डोक्याला लावून आरोपी तुषार पवार यांने तुम्ही परदाडांनो लई माजलात. तुम्हाला खल्लास करून टाकीन असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील लाकडी दांडक्याने साक्षीदार यांचे हातावर पाठीवर मारहाण करून जखमी करून जातिवाचक शिवीगाळ करून आरोपी
बारीकराव विश्वनाथ मोरे, गोंदाबाई विश्वनाथ मोरे ५ (नाव गाव माहित नाही) यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ते सर्व जण तेथून निघून गेले. तसेच साक्षीदार क्रमांक 1,2 यांना तसेच इतर साक्षीदारांवर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपचार करण्यात आले असून फिर्यादी रेखा लक्ष्मण काळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 307, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, प्रमाणे आर्म ॲक्ट 3/25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3)/135 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम 4(i)(1)(s),3(1)(10) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याचे विरुद्ध भादवि कलम 302 व इतरही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
माहिती मिळताच घटनास्थळास कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक राहुल हिंगसे
यांनी भेटी दिल्या. या घटनेचा पुढील तपास कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करत आहेत.
No comments:
Post a Comment