जामखेड प्रतिनिधी : ३१ आॅक्टोबर
संपूर्ण देशात पोलादी पुरूष म्हणून गौरविलेले सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून साजरी करण्यात आली.
आज दि. ३१ ऑक्टोबर या सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार देशातील प्रत्येक पोलीस स्टेशनला हा कार्यक्रम घेण्यात आला. त्या अंतर्गतच जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सर्वाना राष्ट्रीय एकतेची शपथ दिल. तसेच पोलीस परेडचेही आयोजन करण्यात आले होते.
या वेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक अनिल भारती, सहायक फौजदार महादेव गाडे, पोलीस हेडकॉन्टेबल रमेश फुलमाळी, पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत, अविनाश ढेरे, बाळासाहेब तागड, राहुल हिंगसे, पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी, विष्णू म्हेत्रे, अजीनाथ जाधव. विजय सुपेकर, दत्तु बेलेकर, विकास वांढरे, श्रीकांत शिंदे, अनमोल चन्ने ज्ञानेश्वर कोठुळे, महिला पोलीस काॅन्स्टेबल सपना शिंदे, कोमल भुंबे हे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे येथे रुजू झालेपासून पोलीस स्टेशनच्या वतीने अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत सलग दोन वर्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबीरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. जामखेड शहर व तालुक्यात एकाच दिवशी अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली होती. तर गणेश उत्सवामध्येही सहभागी होऊन पोलीस बांधवा बाबत एक वेगळा अनुभव समाजापुढे ठेवला आहे.
No comments:
Post a Comment