जामखेड प्रतिनिधी : २९ आॅक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण
येथील जामखेड रोडवरील आजीनाथ गेणदेव भोरे (वय ५०) यांच्या राहते घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशाने तरी तोडुन घरामध्ये प्रवेश करून घरामधील कपाटाची व सामानाची उचकापाचक करून कपाटामध्ये ठेवलेले ५० हजारांच्या रूपयांच्या रोख रक्कमेसह २३००० रूपये किंमतीची एक सोन्याची बोरमाळ, कानातील फुले, नथ, व दोन ओम असे अंदाजे 30 ग्राम वजना सोन्याचे दागिने असा एकूण ७३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज दिवसा घरफोडी करून लबाडीचे इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. यानुसार फिर्यादी आजीनाथ गेणदेव भोरे
यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याच्या विरोधात भा.द.वि. कलम 454, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज दि. २९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान म्हणजे दिवसा ढवळ्या घडली आहे.
घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हेडकॉन्टेबल आर.के. सय्यद हे करत आहेत
No comments:
Post a Comment