धनशक्तीला वाटते पैशाच्या जोरावर महाराष्ट्र विकत घेऊन आणि तो खंडाने देऊन अमेरिकेला जगायला जाऊ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची रोहित पवार यांचे नाव न घेता टिका - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

Home ठळक बातम्या राजकीय धनशक्तीला वाटते पैशाच्या जोरावर महाराष्ट्र विकत घेऊन आणि तो खंडाने देऊन अमेरिकेला जगायला जाऊ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची रोहित पवार यांचे नाव न घेता टिका

धनशक्तीला वाटते पैशाच्या जोरावर महाराष्ट्र विकत घेऊन आणि तो खंडाने देऊन अमेरिकेला जगायला जाऊ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची रोहित पवार यांचे नाव न घेता टिका

शनिवार, ऑक्टोबर २९, २०२२ ठळक बातम्या, राजकीय,

जामखेड प्रतिनिधी : २९ आॅक्टोबर 

    सन २०२४ ला हातात हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ साफ करायचा आहे. एका बाजूला धनशक्ती तर दुसऱ्या बाजूला जनशक्ती असा संघर्ष आहे. धनशक्तीला वाटतंय महाराष्ट्र विकत घेऊन तो खंडाने देऊन अमेरिकात जगायला जाऊ असा टोल आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांनी कर्जत जमखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना लावलाय तसेच आपल्याला सर्व सामान्य माणसासाठी काम करायचे आहे, आमचं आणि सारखेच आहे. धनशक्तीच्या विरोधात मी एकटाच लढत होतो आता अनेक माणसं सोबत आहेत, असे मत आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांनी व्यक्त केले. 
      आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी आरोग्यमंत्री तनाजी सांवत यांनी आमदार राम शिंदे यांच्या कार्यक्रमाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते .
ते आ. शिंदे यांच्या वतीने चोंडी येथे आयोजित फराळाच्या कार्यक्रमात बोलत होते.


     गेली पंधरा वर्षे शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत मग ते मागच्या दाराने आले आहेत. असं त्यांना म्हणायचं आहे का? जर शरद पवार हे त्यांचे सख्खे आजोबा असते तर ते असं बोलले असते का? असा प्रश्नही आ. राम शिंदे यांनी उपस्थित केलाय. याबरोबरच रोहित पवार यांनी भुरटं चॅलेंज देऊ नये ; गोलमाल करायचं नाही ; काय असेल तर थेट ; असे म्हणत आ. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आ. रोहित पवारांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे ओपन चॅलेंज दिले '
 माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ; यावेळी आमदार राम शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते .
राम शिंदे विधानपरिषदेचे आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना राजीनामा देऊन जनतेतून  निवडून येण्याचे आव्हान दिले होते यावर राम शिंदे यांनी पलटवार केला आहे.
        यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, “आजच्या दिवाळी फराळ कार्यक्रमास आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज चोंडीला आले होते. मंत्री महोदयांनी माझ्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला भेट दिली, त्यांना देखील दहा फोन करून सांगितलं, साहेब नका ना जाऊ, साहेब नका ना जाऊ माझ्या मतदारसंघात, अरे, माझे आणि तानाजी सावंत साहेबांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असं कुठं असतं का राजकारणात,” असे म्हणत राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत आरोपांचा धुराळा उडवून दिला आहे.
आमदार राम शिंदे हे मागच्या दाराने आमदार झाले आहेत अशी टीका आमदार रोहित पवार आणि शिंदे विरोधकांकडून सातत्याने होते, यावर बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले कि, “मला ज्या मुद्द्यावरती टोकलं, मागच्या दाराने आलेत, मी विधान परिषदेेर आमदार झालोय हे मला मान्य, २०१९ साली माझा पराभव झाला हेही मला मान्य आहे. परंतू आदरणीय शरद पवार साहेब गेली १५ वर्षे झाली मागच्या दाराने आहेत, आणि दररोज दैनंदिन राज्य आणि केंद्र सरकारला ते सल्ले देतात, मग माझ्यावर हे बोलतात मागच्या दाराने, तर त्यांना असं म्हणायचयं का? पवार साहेब देखील मागच्या दारानेत, माझं त्याच्यावर असं म्हणणं आहे की, पवार साहेब हे त्यांचे सख्खे आजोबा जर असते तर ते असं म्हटले नसते, चुलत आजोबा असल्यामुळं कदाचित त्यांनी वक्तव्य केलं असावं,” अशी खोचक टीका करत आमदार शिंदे यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.
“मी हाडाचा कार्यकर्ताय आणि कार्यकर्त्याचा नेता झालो, मंत्री झालो, आणि म्हणून मी त्यांचे चॅलेंज स्विकारलं, पण विधान परिषदेचा आमदार राजीनामा देऊन निवडणूक लागत नाही, त्यासाठी विधानसभेच्या आमदाराने जर आमदारकीचा राजीनामा दिला तरच निवडणूक लागेल असे सांगत मी त्यांना चॅलेंज देतो, निवडणूक लागली कि मीही राजीनामा देऊनच तुमच्या पुढे उभा राहीन, मी बिगर राजीनाम्याचा पुढं उभा राहणार नाही, त्यामुळे राजीनामा आता विधानसभेच्या आमदाराने देणं अपेक्षित आहे. आणि मी जर राजीनामा देऊन निवडणूक लागली असती तर मीही दिला असता,” असे म्हणत राम शिंदे यांनी पुन्हा एकदा रोहित पवारांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे खुले अव्हान दिले.
“आमदार राम शिंदे पुढे म्हणाले की, प्रश्न असाय की, चॅलेंज देऊन, असं भुरटं चॅलेंज देऊ नये, आलं का लक्षात, असं गोलमाल करायचं नाही, काय असलं तर थेट असे त्यामुळं चॅलेंज मी पण दिलयं, राजीनामा देऊन त्यांनी मैदानात उतराव, बघू  कर्जत-जामखेडच्या जनतेच्या मनातकाय आहे ते, आणि मी देखील राजीनामा देऊनच पुढे उभा राहीन, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी मी निवडणूकीस सज्ज आहे असा इशारा दिला.”
आ. राम शिंदे यांच्या वतीने चोंडी येथे आयोजित फराळाच्या कार्यक्रमासाठी कर्जत, जामखेड सह आष्टी, भुम, परांडा आदी विविध तालुक्यातून भाजपा कार्यकर्ते व आ. शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags # ठळक बातम्या # राजकीय
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय
Posted at शनिवार, ऑक्टोबर २९, २०२२
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels ठळक बातम्या, राजकीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...

Popular Posts

जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास झाली सुरवात

ऐतिहासिक खर्डा किल्ल्यासमोरील जनसुविधा केंद्राचे बांधकाम थांबवुन जागा बदलावी , श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व खर्डा ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारा मागणी

नगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या बारा सीमांवर पोलिसांची नाकाबंदी,वाहनांची तपासणी सुरू

रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा; जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल तर आम्ही अशांच्या तोंडच पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही

जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित आमदार - नामदार यांचा नेवासा येथे जाहिर सत्कार समारंभ!वआमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांच्यावतीने मतदारांचे जाहिर आभार व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार

आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले पाहिजे - आ.सुधिर तांबे

नेवासा पोलीस ठाण्यात मोठा बदल: संतोष खाडे यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती तर पो.नि. धनंजय जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली!

खर्डा ग्रामपंचायतीमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मोटारसायकल चोरी करणारा चोरटा २४ तासांत गजाआड खर्डा पोलिसांची कामगिरी

कत्तलीसाठी बळजबरीने जनावरे वाहतूक करणारे २ आरोपी खर्डा पोलिसांकडून अटकेत

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *