जामखेड प्रतिनिधी : ३० नोव्हेंबर
नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेले पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रा.सचिन गायवळ यांच्या संकल्पनेनुसार समाजातील इतरांसमोर अदर्श ठेवत आपला पुतण्या पृथ्वीराज निलेश (भाऊ) गायवळ यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या निमित्त आज दि. २० नोव्हेंबर रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून साकत येथील गोशाळेत सर्व जनावरांना चारा वाटप करून तेथील दोन गायांची कायमस्वरूपी पालनाची जबाबदारी घेऊन स्वतःच्या फार्म हाऊसवर (शेतात) पोहच करून एक सामाजिक दातृत्व सिद्ध केले आहे. सोनेगाव येथील प्रा. सचिन गायवळ सर व त्यांचे गायवळ कुटुंबाच्या घरातील व्यक्तींचा वाढदिवस हा साकत येथील गोशाळेला चारा वाटप करूनच केला जातो. हे त्यांच्या कुटुंबाचे एक वैशिष्ट्य आहे.
साकत येथिल गोशाळेत चारा वाटपप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडू राजे भोसले, शिवाजी (नाना) खंडागळे, मनसे तालुका प्रमुख प्रदीप टापरे, फिरोज शेख, अभिजीत लोहकरे, राजू मेत्रे, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा, निलेश माने, रमेश टिपरे, गोवर्धन कडू, बापू कदम, पत्रकार दत्तराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
चिरंजीव पृथ्वीराज गायवळ यांचेवर समाजातील विविध स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment