जामखेड प्रतिनधी-९नोव्हेंबर
जामखेड येथील नागेश्वर मंदिराच्या शेजारील शेतात आसऱ्याला राहणारी रस्त्यावर दिशाशून्य अवस्थेत फिरणारी मनोरुग्ण,आजारग्रस्त तसेच निराधार असलेली एक मनोरुग्ण महिला जामखेड येथील नागेश्वर मंदिराच्या शेजारील शेतात आसरा घेऊन राहत आहे.रात्री अपरात्री तिच्यावर अतिप्रसंग होण्याचा संभव आहे अशी माहिती स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प कार्यालयाला मिळाली.स्नेहालयचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले व क्षेत्रिय अधिकारी मजहर खान यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ती महिला आसरा घेऊन राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्या मनोरुग्ण महिलेशी संवाद साधला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्नेह मनोयात्री प्रकल्प अहमदनगर टीमशी संपर्क साधला.सदर महिलेला मानसिक आणि शारीरिक उपचारांची गरज आहे अशी माहिती संबंधितांना दिली.स्नेह मनोयात्री प्रकल्पाचे समन्वयक रमाकांत दोड्डी,निखिता इंगोले,सविता अतकरी,
हरिदास घोडेस्वार,अनिल आजबे व टीम जामखेड येथे त्वरित दाखल होत त्या मनोरुग्ण महिलेस पुढील उपचार आणि पुनर्वसनासाठी प्रकल्पात घेऊन जाण्याची प्रक्रिया प्रकल्पाचे समन्वयक रमाकांत दोड्डी,जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,मजहर खान यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे मनोरुग्ण महिलेची संपूर्ण माहिती पोलिस निरीक्षक मा.संभाजी गायकवाड,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.शशांक वाघमारे यांना देत पूर्ण केली.स्थानिक नागरिक राजेंद्र मरळ,मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे आशा सुपरवायझर सुवर्णा हजारे,ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी मोहित कदम,रोहित होडशीळ,जामखेड पोलीस कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
समाजापासून दुरावलेल्या स्कीझोफ्रीनियाग्रस्त मनोरुग्णांना डीवचणारी अनेक लोक असतात.अनेकदा अशा आजारातून जात असलेल्या महिलांना समाजाकडून स्वीकारण्यात येत नाही.नवमाध्यमांना तत्काळ आपलेसे करणारे लोक आपल्याच परिवारातील महिलांना मात्र उपेक्षित ठेवतात. मात्र,अशा मनोरुग्णांचे आधारवड बनून स्नेहालय स्नेह मनोयात्री प्रकल्प या ध्येयाने कार्य करत आहे.स्नेहालय स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्रातून गेल्यावर्षेभरात २४७ मनोरुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.या संस्थेत भारतातीलच नव्हे तर नजीकच्या देशातील मनोरुग्ण देखील दाखल करून घेतल्या जातात.केवळ स्वबळावर व लोकसहयोगातून ही संस्था १९८९ पासून एकूण २२ प्रकल्प कार्यरत आहे.या केंद्रात पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र असे विभाग आहेत.येथे दाखल झालेल्या रुग्णांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून रुग्णाला संबंधित वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते.थोडे बरे झाल्यानंतर विविध आवडीचे कामे हाताळण्यासाठी दिली जातात.जेणेकरून सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगण्याची त्यांना कमी अधिक प्रमाणात सवय लागेल.पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची शहानिशा करून त्यांना घरी सोडण्यात येते.तसेच पुढील दोन वर्षापर्यंतची औषधी मोफत पुरविण्यात येतात अशी माहिती स्नेहालय स्नेह मनोयात्री टीम'ने दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा