खर्डा प्रतिनधी : ३० डिसेंबर
खर्डा येथील पोलीस स्टेशन कार्यान्वित झाल्यापासून खर्डा शहरातील टवाळखोर व रोडरोमिओंची संख्या कमी झाली असून खर्डा शहर तसेच शाळा महाविद्यालयातील मुली मोकळेपणाने फिरू लागल्या आहेत. याशिवाय मुलींना शाळा महाविद्यालयांमध्ये कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर खर्डा
पोलीस स्टेशनने तुमच्यासाठी तक्रारपेट्या ठेवल्या असून पत्राद्वारे तुमच्या लेखी अडचणी त्यात टाकू शकता. पोलीस स्टेशन किंवा माझ्याशी थेट संपर्क साधू शकता. खर्डा पोलीस तुम्हाला सुरक्षा पुरवण्यासाठी सक्षम असल्याचे प्रतिपादन खर्डा पोलीस कॉन्स्टेबल अयोध्या पोकळे यांनी व्यक्त केले.
नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी काम करणाऱ्या श्री संत गजानन महाविद्यालयात महिला व मुलींच्या संरक्षणासाठी असलेल्या निर्भय कन्या अभियानांतर्गत एक जाहिर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन खर्डा गावच्या सरपंच सौ. नमिता गोपाळघरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून खर्डा पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल अयोध्या पोकळे, पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार संतोष थोरात, वृषाली जेधेसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना संपादिका श्वेता गायकवाड म्हणाल्या की, खर्डा येथे पोलीस स्टेशन झाल्यापासून मुलींच्या सुरक्षेत वाढ झाली असून मुली आता मोकळ्या वातावरणात फिरू लागल्या आहेत.
आजच्या युगात मुलींनी प्रत्येक गोष्टीत होकार न देता चुकीच्या गोष्टींना नकार देणे शिकले पाहिजे. मुलींनी स्वतः सक्षम झालं पाहिजे. मुलींनी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गरजेचे आहे. महिलांनी पुढे येऊन बोललं पाहिजे.
खर्डा पोलीस स्टेशन आपल्यासाठी २४ तास तत्परतेने काम करत आहे. आपल्याला काही पण अडचण आली तर आपण पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या अडीअडचणी सोडवु शकतो. मुलींनी प्रत्येक क्षेत्रात उतरले पाहिजे, मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत,कारण आपल्या गावच्या सरपंचही महिला आहेत. त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. मी पण एक दिवस सरपंच होईल असं पण आपल्या मनात आलं पाहिजे, मुलींच्या कपड्यांवरून नाही तर त्यांच्या संस्कारावरून व विचारांवरून त्यांना ओळखलं गेलं पाहिजे, मुलीने आपले आई-वडिलांनी दिलेले संस्कार नेहमीच जपले पाहिजेत असेही मत श्वेता गायकवाड यांनी व्यक्त केले.यावेळी सरपंच नमिता गोपाळघरे, कॉन्स्टेबल आयोध्या पोकळे, पत्रकार संतोष थोरात, प्राचार्य शिवानंद जाधव यांनी आपल्या भाषणाद्वारे मुलींना चांगले विचार सांगितले. व चांगल्याप्रकरचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण विकास अधिकारी प्राध्यापक धनंजय जवळेकर यांनी केले सूत्रसंचालन शिवानी तर आभार भाग्यश्री यांनी मांनले
No comments:
Post a Comment